Pune News: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पाच वर्षांपूर्वी स्वामित्व योजनेअंतर्गत गावनिहाय सुरू करण्यात आलेल्या ड्रोनद्वारे मालकी घर संपतीचे गावठाणनिहाय मॅपिंग करून प्रॉपटी कार्ड वाटपाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.
खेड तालुक्यात पहिल्या टप्प्यातील १० गावांतील ३३८ मालमत्ता धारकांना प्रॉपटी कार्डचे वाटप करण्यात येऊन या माध्यमातून फी, चलनाद्वारे २ लाख १० हजार ६५९ रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती खेड तालुका भूमिअभिलेख कार्यालयाचे भूमी अधीक्षक नितीन सूर्यवंशी यांनी दिली.
खेड तालुक्यातील प्रॉपटी कार्डवाटप प्रारंभ पश्चिम भागातील गोरेगाव गावापासून करण्यात आला. खेड भूमि अभिलेख कार्यालयामार्फत मशिनद्वारे गावनिहाय सर्व्हेक्षण करून ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंद असलेल्या गावठाण हद्दीतील घरे, अंगण, मोकळ्या जागांच्या मालकी नोंदीवरून प्रत्येक मालकी संपत्तीचे अचूक मोजमाप मॅपिंग करून नकाशे तयार करून प्रत्येक घरांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. या कायदेशीर शासकीय कागदपत्रांचा दस्तऐवज शासन दरबारी कायमस्वरूपी ठेवा स्वरूपात जतन होणार आहे.
गावनिहाय वाटप केलेल्या प्रॉपर्टी कार्डचे वाटप
गाव मालमत्ता धारक जमा महसूल (रुपयांत)
गोरेगाव ५० २० हजार ६३५
येणिये बुद्रुक ४२ २३ हजार ४००
कान्हेवाडी बुद्रुक ४७ ३३ हजार ५०९
मोहकल ६ ५ हजार २५४
काळेची वाडी २७ १४ हजार ३६९
नाणेकरवाडी ७१ ३९ हजार १७१
बिरदवडी २० १९ हजार ९३७
आसखेड खुर्द ३१ २५ हजार ५१४
आसखेड बुद्रुक ९ ६ हजार ७९०
कान्हेवाडी तर्फे चाकण ३५ २२ हजार ८०
एकूण ३३८ २ लाख १० हजार ६५९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.