Leenseed Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Leenseed Cultivation : पूर्व विदर्भात जवस लागवडीला प्रोत्साहन

PDKV Leenseed Update : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गंत (पीडीकेव्ही) असलेल्या अखिल भरतीय समन्वयीत जवस संशोधन केंद्राच्या माध्यमातून जवस लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

Team Agrowon

Nagpur News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गंत (पीडीकेव्ही) असलेल्या अखिल भरतीय समन्वयीत जवस संशोधन केंद्राच्या माध्यमातून जवस लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याकरिता धानपट्ट्यासह पश्‍चिम विदर्भात डेमो प्लॉट देत या पिकाविषयी जागृतीवर भर देण्यात आला असल्याची माहिती प्रकल्पाचे समन्वयक स्वप्नील ठाकरे यांनी दिली.

पूर्व विदर्भातील पाच जिल्हे हे धान उत्पादक म्हणून ओळखले जातात. यातील चार जिल्ह्यात एकच पीक पद्धती घेतली जाते. त्यामुळे आर्थिक सक्षमता या पट्ट्यात निर्माण होऊ शकली नाही. हीच बाब हेरत नागपूर कृषी महाविद्यालयांतर्गत असलेल्या जवस संशोधन केंद्राच्या माध्यमातून या भागात जवस लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.

२८० डेमो प्रात्यक्षिक प्रत्येकी एक एकरावर त्याकरिता घेण्यात आले. पश्‍चिम विदर्भातील अमरावती १४, अकोला १२, वर्धा १०, नागपूर २० याप्रमाणे प्रात्यक्षिकावर भर देण्यात आला आहे. बियाणे, बीजप्रक्रिया निविष्ठा असे साहित्य प्रकल्पातून दिले जाते. आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत निधीची उपलब्धता झाल्यास थेट खात्यात निधी हस्तांतरीत करण्यावरही यामध्ये भर देण्यात आला आहे.

किटाडी, डोमा, चंद्रपूर, शंकरपूर, सिंदेवाही या भागांत हा प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. याला शेतकऱ्यांचा देखील आता प्रतिसाद मिळत असून, गेल्या हंगामात शिवणी गाव परिसरात एक एकरावर हा प्रयोग होता आता २५ एकरांवर जवस लागवड पोहोचली आहे, असे स्वप्नील ठाकरे यांनी सांगितले. ११० ते ११५ दिवसांच पीक असून सिंदेवाही तालुक्‍यात तर शून्य मशागत तंत्रज्ञानावर जवस लागवडीचा प्रयोग केला आहे.

धान काढल्यानंतर उपलब्ध ओलाव्यावर हे जवस पीक घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. २० ते ३० टक्‍के ओलावा धान काढणीनंतर राहतो. त्याचाच उपयोग करून जवस पीक घेता येता. पीकेव्ही एनएल-२६० या वाणात ३८ टक्‍के तेलाचे प्रमाण, ओमेगा ५८ टक्क्यांपर्यंत मिळतो. अशा प्रकारची वैशिष्ट्ये असलेले भारतात हे एकमेव वाण आहे. शंकरपूर (चंद्रपूर) येथे तेलघाणी असून त्या ठिकाणी जवसावर प्रक्रिया होते. वीस वर्षांपूर्वी या भागात जवस होत होते आता पुन्हा या पीकाला प्रोत्साहन दिले जात आहे.
स्वप्नील ठाकरे, समन्वयक, जवस उत्पाद प्रकल्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT