phule wada Agrowon
ॲग्रो विशेष

Baliraja : पुण्यात बळीराजाला नमन; मिरवणुकीद्वारे मानवंदना

Diwali celebration : बलिप्रतिपदेनिमित्त मंगळवारी (ता.१४) कृषिसम्राट बळीराजास मिरवणूकीद्वारे मानवंदना देण्यात आली. महात्मा फुले वाड्यापासून बळीराजा मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी बळीराजासह सत्यशोधक समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Team Agrowon

Pune News : कृषिसम्राट बळीराजास बलिप्रतिपदेनिमित्त (ता.१४) मिरवणुकीच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. सत्यशोधक समाजाच्या वतीने येथे आयोजित बळीराजा मिरवणूक महात्मा फुले वाडा ते लाल महाल आयोजित करण्यात आली होती. जोरदार जयघोषाने बळीराजाचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आला.

सत्यशोधकांच्या पुढाकारातून पुण्यात गेल्या वीस वर्षांपासून बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा गौरव मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी समता भूमीत ॲड. मोहन वाडेकर आणि शारदा वाडेकर यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास तर, प्राची दुधाने यांच्या हस्ते सद्य बळीराजाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात प्रा.प्रतिमा परदेशी यांनी प्रास्ताविक केले. सचिन बगाडे, राजेंद्र शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

फुले वाडा येथून मिरवणुकीस उत्साहात प्रारंभ करण्यात आला. कृषी धनाने सजवलेला रथावर सम्राट बळीराजाचा जिवंत देखावा करण्यात आला. फळ, भाज्या आदी कृषीधन वाटत मिरवणूक मार्गस्थ झाली. चौका चौकात बळीराजा मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. लहुजी वस्ताद साळवे तालीम चौक, सावित्रीबाई फुले स्मारक चौक, मीठगंज पोलीस चौकी, फडके हाउद चौक, कसबा गणपती चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या.

लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता झाली. पान सुपारीच्या कार्यक्रम झाला. याप्रसंगी ॲड. वाडेकर, रमेश राक्षे, ॲड. जाकीर अत्तार यांनी मार्गदर्शन केले. किशोर ढमाले यांनी आभार मानले. यावेळी विठ्ठल सातव, दत्ता पाकीरे, विलास किरवते, राजू पाटील, ॲड. शारदा वाडेकर आदीं उपस्थित होते. मिरवणूक यशस्वितेसाठी व्ही. जे. वळवी, आकाश ढोक, राजेंद्र शेलार,मारुती जाधव आदींनी परिश्रम घेतले.

पुणे : बलिप्रतिपदेनिमित्त मंगळवारी (ता.१४) कृषिसम्राट बळीराजास मिरवणूकीद्वारे मानवंदना देण्यात आली. महात्मा फुले वाड्यापासून बळीराजा मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी बळीराजासह सत्यशोधक समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT