Orange Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Processing : तासाला होणार पाच टन सत्र्यांवर प्रक्रिया

Orange Production : संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात संत्रा फळपीक मुबलक प्रमाणावर घेतले जाते. हा भाग संत्र्याचा बेल्ट म्हणूनही ओळखला जातो.

 गोपाल हागे

Buldana News : तालुक्यातील सोनाळा येथे रविवारी (ता. १०) अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने पहिल्या संत्रा प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन होत आहे. यासाठी तासाला पाच टन मालावर प्रक्रिया होऊ शकणार आहे. प्रक्रिया उद्योगासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात संत्रा फळपीक मुबलक प्रमाणावर घेतले जाते. हा भाग संत्र्याचा बेल्ट म्हणूनही ओळखला जातो. या भागात एकही संत्रा प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा उत्पादकांना मोर्शी, अमरावती, नागपूर येथे जावे लागायचे.

परिणामी वेळ आणि पैसा खर्च व्हायचा. या भागात संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून वर्षानुवर्षे केली जात होती. सध्याच्या काळात बाजारपेठेत चांगल्या दर्जाचा माल असेल तर त्याला भाव मिळतो.

या भागातील संत्र्याला मोठमोठ्या शहरातील बाजारपेठेत नेण्याआधी योग्य प्रक्रिया येथे होईल. या प्रक्रियेसाठी बेंगळूरू येथून तीन अत्याधुनिक मशिन्स आणल्या आहेत. या मशिन्सच्या साह्याने कमी वेळेत दर्जेदार प्रक्रिया करता येणार आहे.

संत्र्यावर क्रमाक्रमाने प्रक्रिया केली जाईल. सर्वात आधी संत्रा क्लिनिंग करून त्यानंतर वॅक्सिंग आणि शेवटी ग्रेडिंग होईल. ग्रेडिंग केलेला माल सरळ बाजारपेठेत जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT