Chandrakant Pulkundwar  
ॲग्रो विशेष

Facilities of Varkari : वारकऱ्यांना सुविधा देण्यासह स्वच्छतेला प्राधान्य द्या

Divisional Commissioner Chandrakant Pulkundwar : वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

Team Agrowon

Pandharpur News : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात.

या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी पालखी तळासह पंढरपुरातील विविध कामांची पाहणी केली. यावेळी आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, नगर विकास विभागाचे उपसचिव तथा समन्वय अधिकारी अनिरुद्ध जेवळीकर सार्वजनिक बांधकामचे अधिक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी सचिन इथापे, अमित माळी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, तहसीलदार सचिन लंगुटे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले, पालखी मार्गावरुन पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरुस्ती करावी. पालखी तळावर आवश्यक ठिकाणी मुरूमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा ,आरोग्य सुविधा देण्यात याव्यात. भंडीशेगाव पालखी तळावर पाणी साचणार याची दक्षता घ्यावी. तसेच त्या ठिकाणी आवश्यक यंत्रणा उपलब्ध ठेवावी.

पालखी तळांवर कायमस्वरूपी सुविधा देण्याबाबत पालखीसोहळा प्रमुखांशी चर्चा करुन नियोजन करावे. वारी कालावधीत वैद्यकीय सुविधेबरोबर तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. श्री संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा स्वागत विसावा मंदिर येथे श्री नामदेव महाराजांचा पालखी सोहळ्याकडून करण्यात येते. या ठिकाणी स्वागतासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. 65 एकर येथे प्रशासनाकडून दिड्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात येते. ती जागा अपुरी पडत असेल तर खाजगी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US Iran Conflict: दोन आठवड्यांची शस्त्रसंधी

Fruit Price Issue: फळपिकांना नाममात्र दर; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Jaggery Market Trade: कोल्हापूर बाजार समितीत गूळ सौद्यात अडथळे कायम

Maharashtra Weather Forecast: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

Onion Procurement Policy: केंद्र सरकारचा कांदा खरेदीत हात आखडता

SCROLL FOR NEXT