Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मची जोरदार सुरूवात झाली आहे. मोदी यांनी आपला पदभार स्वीकारताच पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी केला. त्यापाठोपाठ आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच शिवराजसिंह चौहान अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच कृषी मंत्रायलातील अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या आहेत. तसेच शिवराजसिंह म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकरी आणि गावांच्या उन्नतीला सरकारचे प्राधान्य असेल असेही, शिवराजसिंह म्हणाले.
शिवराजसिंह यांनी म्हटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी आणि शेतकरी कल्याणासाठी काम केले जात आहे. ग्रामीण विकासाची कामेही वेगाने होत आहेत. गेल्या १० वर्षात चांगली कामे झाली असून, शेतकरी कल्याण असो की ग्रामीण विकास, यासाठी आम्ही एक रोडमॅप तयार केला आहे. त्या रोडमॅप प्रमाणे कामांना आम्ही प्राधान्याने पुढे नेणार आहोत. त्याप्रमाणेच मोदींनी पहिली स्वाक्षरी शेतकऱ्यांच्या हितासाठी केली. मंत्रिमंडळाने किसान सन्मान निधी जारी करण्याचा निर्णय घेतला.
शिवराजसिंह पुढे म्हणाले, "आमचे सरकार देशभरातील शेतकरी बंधू-भगिनींच्या कल्याणाशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेन. प्रत्येक शेतकरी कुटुंबाने आनंदी राहावे आणि विकास प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे, हा माझा प्रयत्न असेल असेही शिवराजसिंह म्हणाले.
तसेच गरिबांसाठी आणखी ३ कोटी घरे बांधण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाने घेतला आहे. हे काम सध्या सुरू असून ते पुढे नेणार आहे. या कामात सातत्य असून ते सातत्य कायम राहील असेही मत शिवराजसिंह यांनी मांडले.
दरम्यान शिवराजसिंह यांनी सोमवारी सायंकाळी देशातील कृषी अधिकाऱ्यांची अनौपचारिक बैठक घेतली. तसेच विभागातील प्रमुख विषयांवर सामान्य माहितीसह घेऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना अधिकाऱ्यांना शिवराजसिंह यांनी दिल्या. शिवराजसिंह मंगळवारी (ता.११) सकाळी कृषी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारणार असून ते अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक घेणार आहेत.
शिवराजसिंह राजकीय प्रवास
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चौहान यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. त्यांनी पहिली निवडणूक १९९० साली लढवली आणि ते विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते ११९१ मधील पोटनिवडणुकीत ते विदिशामधून खासदार झाले. त्यानंतर त्यांनी १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ असे चार वेळी ते विदिशामधून खासदार झाले. त्यानंतर पहिल्यांदा २९ नोव्हेंबर २००५ मध्ये शिवराजसिंह यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २००८ मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. तर १४ डिसेंबर २०१३ रोजी मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा आणि २०२० मध्ये चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आता २०२४ मध्ये ते सहाव्यांदा खासदार झाले असून ते आता केंद्रीय कृषी बनले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.