Budget 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Budget 2024 : 'हा' अर्थसंकल्प तरुण, गरीब, महिला, शेतकऱ्यांना सशक्त करेल : पंतप्रधान मोदी

Interim Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज गुरूवारी (१ फेब्रुवारी) सादर केला. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'आजचा अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून तो सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण', असल्याचे म्हटले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मोदी सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज गुरूवारी (१ फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी, महिलावर्ग, युवकांसह मध्यमवर्गीयांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मात्र, या घोषणा लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्या गेल्या आहेत, अशी टीका विरोधकांनी केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'आजचा अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून तो सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण, असल्याचे म्हटले आहे. तसेच, 'हा' अर्थसंकल्प तरुण, गरीब, महिला, शेतकरी या विकसित भारताच्या चार स्तंभांना सशक्त करेल, असेही मोदींनी म्हटले आहे.

तसेच मोदी म्हणाले, "गरिबांसाठी आम्ही ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ४ कोटींहून अधिक घरे बांधली आहेत. आता आम्ही आणखी २ कोटी नवीन घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आमचे उद्दिष्टे हे २ कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा होता. त्यात आता वाढ करण्यात येईल. आमचे उद्दिष्ट हे ३ कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे असेल.

पुढे मोदी म्हणाले, "आज या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही खूप महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नॅनो डीएपीचा वापर, प्राण्यांसाठी नवीन योजना, पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार आणि आत्मनिर्भर भारत तेल बियाणे अभियान हाती घेण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासह खर्च कमी करण्यावरदेखील भर दिली जाईल.

तर 'हा' अर्थसंकल्प भारताच्या तरुण आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नवोपक्रमासाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात स्टार्टअप्सना करमाफीची मुदतवाढही जाहीर करण्यात आली आहे. तर वित्तीय तूट नियंत्रणात ठेवत भांडवली खर्चाला ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांकी निधी देण्यात आला आहे.

'हा' अर्थसंकल्प म्हणजे जादूच्या प्रयोग : उद्धव ठाकरे

दरम्यान या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार टीका केली आहे. त्यांनी, 'हा' अर्थसंकल्प म्हणजे जादूच्या प्रयोग असून जसे जादूमधील कबूतर उडून गेल्यावर हाती काही उरत नाही तसाच हा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. तर अशा फसव्या अर्थसंकल्पाची आम्हाला गरज नसून मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल असेही ठाकरेंनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT