Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूध दरात कपात झाली पण पशुखाद्याच्या दराची वाढ कोण रोखणार?

Animal Feed : पशूखाद्याचे दर वाढत आहेत तर दुसरीकडे दूध दरात मात्र कपात झाली असून, दुधाचा दर तीन ते चार रुपयांनी कमी झाला आहे.

sandeep Shirguppe

Milk Rate Maharashtra : राज्यात मागच्या काही दिवसांपूर्वी गायीच्या दूध दरात मोठी कपात करण्यात आली. राज्यातील महत्वाच्या दूध संघांनी जवळपास गायीच्या दूध दरात दोन रुपयांनी कपात केली. दरम्यान याउलट परिस्थिती पशुखाद्याच्या दरांची झाली आहे. मागच्या वर्षभरात पशुखाद्यात झालेल्या वाढीमुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

पशूखाद्याचे दर वाढत आहेत तर दुसरीकडे दूध दरात मात्र कपात झाली असून, दुधाचा दर तीन ते चार रुपयांनी कमी झाला आहे. सध्या पशुखाद्याचे दर १ हजार ४०० ते १ हजार ७५० रुपये मोजावे लागत आहेत.

यामध्ये सरकी पेंड ४० किलोस १ हजार ३०० ते १ हजार ५००, तर गोकुळच्या गोळी पेंड १२७० रुपये प्रमाणे विकली जाते. याचबरोबर गोकुळ मार्फत मिनलर मिक्सचरला १ किलोस जवळपास १०० रुपये मोजावे लागतात.

गहू भूसा दर १ हजार ५०० च्या पुढे गेले आहेत. दरम्यान गाय आणि म्हैशीला हे पशुखाद्य घातल्याशिवाय दूध वाढत नसल्याने बहुतांश शेतकरी हे पशुखाद्य घालतातच कल असतो. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या विविध कंपन्यांचे पशुखाद्य बाजारात उपलब्ध आहे. त्यामध्ये कंपनीनुसार शंभर, दोनशे रुपयांचा कमी-जास्त फरक आहे.

मात्र, बहुतेक खाद्याचे दर हे १ हजार ४०० रुपयांपेक्षा जास्त आहेत. सध्या म्हैशीला १० फॅटला ६३ ते ६५ रूपये दर मिळतो तर गायीच्या ३.५ ते ८.५ ला ३३ रूपये दर दिला जात. राज्य सरकारकडून कालपासून ही गायीच्या दुधाच्या दरात कपात केली आहे.

जे शेतकरी घरासाठी म्हणून एखादी गाय किंवा म्हैस पाळतात या शेतकऱ्यांना सध्याच्या पशुखाद्याचे दर परवडत नसल्याचे चित्र आहे. एका म्हैशी पाठीमागे शेतकऱ्याला दर १० दिवसाला जवळपास ३ हजार ते ५ हजार रुपये मिळतात. हा हिशोब आणि पशुखाद्याच्या दोन्ही पोत्याचा ताळमेळ बसवला तर शेतकऱ्यांच्या हाती फक्त शेण आणि घरात पिण्यासाठी दूधच शिल्लक राहते. ४० किलो खाद्याचे पोते जेमतेम दहा दिवस पुरते. त्यामुळे एक म्हैस किंवा गाय असणाऱ्या शेतकऱ्याला खाद्य घालणे परवडत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

या तुलनेत गाय आणि म्हैशीच्या दरात वाढ होताना दिसत नाही. याचबरोबर राज्यात दूध दरात वाढ होणार अशी माहिती बाहेर येताच पशुखाद्याचे दर पन्नास ते शंभर रुपयांनी वाढत असतात. तर जनावरांना ओला आणि सुका चारा जनावरांना घालावा लागतो. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे चाऱ्याचा गंभीर प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT