Monsoon Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : मराठवाड्यात विविध ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची हजेरी

Rain Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव व जालना जिल्ह्यांत गुरुवारी (ता. ९) काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस झाला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव व जालना जिल्ह्यांत गुरुवारी (ता. ९) काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस झाला. एक दोन ठिकाणी वादळासह आलेल्या पावसाने अनेकांची भंबेरी उडवली. याशिवाय शुक्रवारी (ता. १०) फुलंब्री तालुक्यासह काही ठिकाणांना पावसाने झोडपले.

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या मिटमिटा, पढेगाव येथे गुरुवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे दुकानांना लावलेल्या पाट्या उडून गेल्या. फळे, पालीभाजा विक्रेत्यांची भंबेरी उडाली. दुसरीकडे कडक उन्हापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. सुमारे दीड तास पाऊस झाला. खुलताबाद शहर व परिसरात वाऱ्यासह हलका पाऊस झाला. महालगाव, रहिमाबाद, शिऊर परिसरात पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील रोहीलागडमध्ये जोरदार वादळी पाऊस झाला. परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई असून जनावराचा चारा वादळी वारे व पावसाने खराब झाला. धाराशिव जिल्ह्यातील येडशी परिसरात सुमारे अर्धा तास मध्यम पाऊस झाला.

सोयगावच्या १५ गावांना तडाखा

सोयगाव तालुक्यातील बनोटी परिसरात जवळपास १५ गावांना पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. जरंडी, घोसला, नांदगाव, नांदगाव तांडा, तिडका, कींन्ही, वरठाण, बनोटी, हनुमंतखेडा, पहुरी, तिडका, वाकडी, बोरमाळ तांडा, वाडी, पळाशी, गोदेंगाव, निभोरा या गावांत पाऊस झाला. त्यामुळे जनावरांचा चारा भिजून नुकसान झाले.

फुलंब्रीत भिंत पडून एकाचा मृत्यू

फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रूक येथे वादळी वाऱ्याने पत्रे पडून पत्र्यावर भिंत पडली. त्यामुळे प्रल्हाद दलसिंग बारवाल (रा. कन्होरी) यांचा मृत्यू झाला. गल्लेबोरगाव येथे जोरदार, तर आडूळ येथे रिमझिम पाऊस झाला. अंबड, किनगाव परिसरात पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Cultivation: गडहिंग्लजमध्ये भात पुनर्लागण खोळंबली

Rainfall Deficit Maharashtra: जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत नंदुरबार; पेरण्या अजूनही संथ

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजनेच्या निकषात अंशत: बदल, सुधारित शासन निर्णय जारी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात स्थिरता; मका बाजारात चढ-उतार, कोबी दरात चढ-उतार, डाळिंब आवकेत घट तर मेथी भाजीच्या दरात चढ-उतार

Fertilizer Shortage: खानदेशात ‘डीएपी’ची टंचाई कायम

SCROLL FOR NEXT