Kartiki Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Alandi Kartiki Wari : आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्यासाठी तयारी पूर्ण

Kartiki Wari Preparations : कार्तिकी वारी सोहळ्यासाठी मंगळवारी (ता.२६) राज्यभरातून आळंदीत येणाऱ्या भाविकांना दर्शन मंडपात खिचडी, चहा, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सेवा मोफत दिली जाणार आहे.

गणेश कोरे

Pune News : कार्तिकी वारी सोहळ्यासाठी मंगळवारी (ता.२६) राज्यभरातून आळंदीत येणाऱ्या भाविकांना दर्शन मंडपात खिचडी, चहा, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सेवा मोफत दिली जाणार आहे. दरम्यान, भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि मंदिर परिसरात चोऱ्या होऊ नये यासाठी देवस्थानच्या व्यवस्थापनाने नव्वद सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले, की दर्शन मंडपात आणि मंदिराच्या भोवती चोऱ्या रोखण्यासाठी, चोरांवर नजर ठेवण्यासाठी नव्वद सीसीटीव्ही उभारले आहेत.

याचबरोबर मंदिराच्या आतील बाजूस, दर्शन मंडपात आणि प्रवेशद्वारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. वारी काळात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे लाइव्ह दर्शनाची सोय देवस्थानने केली आहे.

यासाठी मंदिरात, दर्शन मंडपात आणि पुंडलिक मंदिरात स्क्रीन बसवले जाणार आहेत. वारीसाठी बाहेरून येणाऱ्या दिंड्यांना देवस्थानकडून निमंत्रण दिले आहेत. दिंड्याचे मंदिर प्रवेश पासवाटप सुरू आहे. सप्तमी आणि अष्टमीच्या दिवशी दिंड्यांना प्रवेश दिला जाईल.

सध्या देवूळवाड्यावर विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर वारी काळात देवूळवाडा, समाधी गाभारा आकर्षक फुलांनी सजविला जाणार आहे. द्वादशीच्या दिवशी करण्यात येणाऱ्या रथोत्सवासाठी देवस्थानने जुना लाकडी रथ तयार ठेवला आहे. रथाचे स्वच्छता आणि त्यावर आकर्षक विद्युत रोषणाईचे काम सुरु आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

Karj Mukti Yojana : आधार प्रमाणीकरणानंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार

Maize Ethanol Project: महाराष्ट्रात उभारणार मका पीक आधारित नवा इथेनॉल प्रकल्प, राज्य सरकारकडून ११५ कोटी निधीला मुंजरी

Cotton Farming Guidance: कोंढवड येथे कापूस उत्पादकांना शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT