Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

Rain Update Parbhani : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत रविवारी (ता. १८) सकाळी ३३.५ मिमी पावसाची नोंद झाली.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत मागील पंधरावड्याासून भाग बदलून एक दोन दिवसाआड पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे. या दोन जिल्ह्यांत शनिवारी (ता. १७) दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहापर्यंत वादळी वारे, ढगांच्या गडगडाट मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

उन्हाळी भुईमूग, बाजरी, केळी, आंबा आदी फळपिके, भाजीपाला पिकांना पावसाचा तडाखा बसला. शिजवून वाळवत घातलेली हळद भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वीज कोसळल्याच्या घटनेत परभणी जिल्ह्यात तरुण, तर हिंगोली जिल्ह्यात महिलेचा मृत्यू झाला. अनेक बैल, गाई दगावल्याचे वृत्त आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत रविवारी (ता. १८) सकाळी ३३.५ मिमी पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात शनिवारी (ता. १७) दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पूर्णा आदी तालुक्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

दुपारी साडेचारच्या सुमारास पिंपरी रोहिला (ता. जिंतूर) शिवारात वीज कोसळून भरत पिसाळ (वय १९) या तरुणांचा मृत्यू झाला. वडाळी (ता. जिंतूर) येथे बैल दगावला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव आदी तालुक्यांत वेगाच्या वारे, विजांच्या कडकडात पूर्वमोसमी पाऊस झाला.

वीज कोसळल्याने पार्डी पोहकर (ता. सेनगाव) येथे शेतात काम करत असलेल्या मुक्ताबाई गिरी (वय ४०) यांचा मृत्यू झाला. जांब आंध येथे वीज कोसळल्याने चार जण जखमी झाले. सध्या या दोन जिल्ह्यांत उन्हाळी भुईमूग, बाजरी, मूग आदी पिकांची काढणी सुरू आहे. हळद काढणी, शिजवणी, वाळवणी, चकाकी देणे आदी यासह पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. पावसामुळे कामांचा खोळंबा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT