Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage : सात तालुक्यांतील शेतीला मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका

Unseasonal Rain Crop Loss : प्राथमिक अंदाजानुसार ५९.०२ लाखांचे शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. सध्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू असून या नुकसानीत आणखी वाढ होणार आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे सात तालुक्यांतील २१३.७९ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. १०.९५ हेक्टर क्षेत्रावरील फळबागा बाधित झाल्या आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार ५९.०२ लाखांचे शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. सध्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू असून या नुकसानीत आणखी वाढ होणार आहे.

जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सात दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. आता पावसाने उसंत घेतली असली तरी मॉन्सून पेरणीपूर्व मशागतीची कामे आणखी आठ दिवस सुरू होण्याची शक्यता नाही. या पावसामुळे सात तालुक्यांतील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यामध्ये पश्चिमेकडील पाटण, सातारा आणि वाई तसेच कोरेगाव यासह पूर्वेकडील माण, खटाव, फलटण, तालुक्यांचा समावेश आहे.

यामध्ये २१३.७९ हेक्टरवरील शेती बाधित झाली आहे. यामध्ये भुईमूग, भाजीपाला, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची, ज्वारी या पिकांचा समावेश आहे.

तसेच १०.९५ हेक्टरवरील फळबागेचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा डाळिंब आणि पपई बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या या नुकसानीचा ७८९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

सध्या कृषी विभागाकडून हे नुकसानीचे पंचनामाचे काम सुरू असून आणखी चार आठ दिवस हे पंचनामे चालणार आहेत त्यानंतर नुकसानीच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

नुकसानीची स्थिती अशी

११६५ घरांची पडझड

२६ लहान मोठी जनावरे मृत

१५० कोंबड्यांचा मृत्यू

२ शेतकऱ्यांचा मृत्यू

५० मंडलांत ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस

शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल, कृषी व इतर विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच नेमक्या नुकसानीचे अंतिम आकडे समजतील. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे भरपाईसाठी पाठवले जातील.
- संतोष पाटील, जिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT