Orange Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Monsoon Rain Impact : मॉन्सूनपूर्व पावसाने ताणावर असलेल्या संत्रा बागा संकटात

Orange Farming Management : संत्र्याचा आगामी बहार धरण्यासाठी शेतकरी एप्रिल-मे महिन्यात झाडांना विश्रांती देऊन ‘ताण’ देत असतात. या काळात बागेचे पाणी पूर्णतः बंद करतात. चांगला ताण बसला तर जून-जुलैमध्ये झाडांवर बहार येतो आणि नंतर फळधारणा होते.

Team Agrowon

Akola News : या महिन्यात होत असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. ताणावर सोडलेल्या संत्रा बागांवर या पावसाचा प्रतिकूल परिणाम होत असून, बहार फुटण्यात अडथळे निर्माण होण्याची भीती मांडत आहेत. तर तज्ज्ञ सध्या फारसे नुकसान होणार नाही, असा दावा करीत आहेत.

संत्र्याचा आगामी बहार धरण्यासाठी शेतकरी एप्रिल-मे महिन्यात झाडांना विश्रांती देऊन ‘ताण’ देत असतात. या काळात बागेचे पाणी पूर्णतः बंद करतात. चांगला ताण बसला तर जून-जुलैमध्ये झाडांवर बहार येतो आणि नंतर फळधारणा होते. मात्र, यंदाचा एप्रिल-मे महिन्यातील पाऊस हे ताणचक्र बिघडवत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

बागांमध्ये ओलावा वाढला तर झाडांना अपेक्षित प्रमाणात ताण बसणार नाही. परिणामी फुलोऱ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. संत्रा बागा ताणावर सोडत व्यवस्थापन केले होते. पश्चिम विदर्भात प्रामुख्याने मेहकर, रिसोडच्या काही भागात पाऊस झाला.

यामुळे भारी जमिनीत संत्रा बागा फुटणार नाहीत, असे शेतकरी सांगत आहेत. यंदा संत्रा बागांनी चांगले उत्पादन दिले. बाजारपेठेत दरही चांगले मिळाले. त्यामुळे शेतकरी आगामी बहार नियोजनात कुठलीही काटकसर न ठेवता तयारीला लागलेले आहेत. अशातच या पावसामुळे थोडा चिंतेचा सूर उमटत आहे.

आजवर झालेला हा पाऊस त्रोटक आणि सार्वत्रिक दिसून येत नाही. त्यामुळे इतक्या पावसाने फरक पडणार नाही. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या पाण्याचा काही बागांना थोडाफार फायदा होईल. पुढे जास्त पाऊस झाला तरच नुकसान होऊ शकतो. तसाच जूनच्या ५ ते ६ तारखेपर्यंत वेळ हातात आहे. या काळात झाडे ताणावर येऊ शकतात. गजर पडली तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढरोधकाचे एक-दोन फवारण्या घेतल्या तरी फायदा होईल.
- निवृत्ती पाटील, संत्रा तज्ज्ञ, केव्हीके, करडा, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT