Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : खानदेशात यंदा धूळपेरणी नाहीच

Kharif Season : खानदेशात पेरणीसाठी पूर्वमशागत वेगात सुरू आहे. ८० टक्के शेती पेरणीसाठी तयार आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात पेरणीसाठी पूर्वमशागत वेगात सुरू आहे. ८० टक्के शेती पेरणीसाठी तयार आहे. परंतु यंदा धूळपेरणी अनेक शेतकरी टाळत आहेत. चांगल्या पावसाचा अंदाज यंदाही आहे. परंतु कमीअधिक पावसात पेरणी वाया जाण्याची भीती असते. यातच बियाणे महाग आहे, यामुळे शेतकरी धूळपेरणी टाळत आहेत.

खानदेशात कापूस, तूर, उडीद, मूग या पिकांची धूळपेरणी अनेक शेतकरी करतात. पाऊस आल्यानंतर मजूर मिळत नाहीत. शेतरस्ते खराब होतात, बियाण्याची टंचाई असते, यामुळे अनेक शेतकरी धूळपेरणी करतात.

अनेकदा चांगला किंवा हवा तसा पाऊस आल्यास धूळपेरणी यशस्वी होते व चांगले उत्पादनही आल्याचे अनुभव आहेत. परंतु मागील वर्षी कमी पावसात धूळपेरणी वाया गेली. तर त्यापूर्वी अतिपावसात धूळ पेरणी फारशी यशस्वी झाली नाही.

धूळ पेरणीसाठी खानदेशात धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावातील धरणगाव, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव आदी भाग प्रसिद्ध आहे. या भागात तेलबिया वगळता अन्य पिकांची धूळपेरणी करणारे अनेक शेतकरी आहे. विशेषतः मोठे शेतकरी धूळ पेरणी करतात. परंतु या शेतकऱ्यांतही यंदा धूळपेरणीबाबत निरूत्साह आहे.

बियाणे महाग

यंदा कापूस, उडीद, मूग व अन्य बियाणे महाग आहे. कापूस बियाण्याची तर टंचाई आहे. जादा दरात कापूस बियाणे घ्यावे लागत आहे. अशातही शेतकऱ्यांना हवे तेवढे व हवे ते कापूस बियाणे मिळत नसल्याची स्थिती आहे.

यामुळे कापूस बियाणे घेवून त्याची धूळपेरणी करणे शेतकरी टाळत आहेत. कारण मागील वेळेसही पावसाचे अनेक अंदाज चुकीचे ठरले होते. यंदाही तसे होवू शकते. यामुळे धूळ पेरणी शेतकरी टाळत असल्याचे चित्र खानदेशात आहे.

पावसाची प्रतीक्षा

खानदेशात पाऊस आल्यानंतर पेरणी होईल, अशी स्थिती आहे. अद्याप कुठेही चांगला पाऊस झालेला नाही. वळवाचा पाऊस काही भागात आला. पण लागलीच उष्णता वाढली. यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला. खानदेशात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणीची लगबग अनेकदा सुरू होते. परंतु यंदा पावसाची प्रतीक्षा आहे.

पाऊस नसल्याने पपईसह अन्य पिकांत आंतरपिकांची लागवडदेखील शेतकरी टाळत आहेत. एक जोरदार पाऊस आल्यानंतर किरकोळ पूर्वमशागत करून लागलीच पेरणीची कार्यवाही सुरू होईल. त्यात चांगला ओलावा किंवा किमान ४० मिलिमीटर पाऊस आल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT