Jayant Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Jayant Patil : राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील बिनविरोध

आजच्या या निवडीने जयंत पाटील यांच्या राजकारणातील वारस प्रतीक हेच असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उपाध्यक्षपदी विजयराव पाटील यांना कायम ठेवण्यात आले आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
इस्लामपूर, जि. सांगली : राज्यात एका साखर कारखान्याच्या चार शाखा करण्याचा विक्रम नावावर असलेल्या येथील लोकनेते राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.

वयाच्या ३२ व्या वर्षी प्रतीक यांनी आज सहकारातील हे पहिलेच पद स्वीकारले आहे.

आजोबा (स्व.) राजारामबापू पाटील यांनी १९६८ साली स्थापन केलेल्या या साखर कारखानदारीची धुरा अंगावर घेतली आहे.

माजी मंत्री जयंत पाटील हेदेखील काहीकाळ या कारखान्याचे अध्यक्ष व त्यानंतर राज्य साखर संघाचे अध्यक्ष राहिले आहेत.

आजच्या या निवडीने जयंत पाटील यांच्या राजकारणातील वारस प्रतीक हेच असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उपाध्यक्षपदी विजयराव पाटील यांना कायम ठेवण्यात आले आहे.

येथील कारखाना कार्यस्थळावरील सभागृहात जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष बैठक झाली.

सहायक अधिकारी म्हणून तालुका निबंधक रंजना बारहाते यांनी काम पाहिले. या बैठकीत प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी कार्तिक पाटील यांनी नावाची सूचना केली. तर रघुनाथ जाधव यांनी अनुमोदन दिले.

उपाध्यक्षपदासाठी विजयराव पाटील यांना देवराज पाटील हे सूचक तर बाळासाहेब पवार यांनी त्यास अनुमोदन दिले.

विहित वेळेत दोन्ही पदासाठी एकच अर्ज आल्याने त्याची छाननी आणि माघारीची मुदत संपल्यानंतर सुरवसे यांनी अध्यक्षपदी प्रतीक पाटील आणि उपाध्यक्ष म्हणून विजयराव बळवंतराव पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी सर्व संचालकांसोबत राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आशीर्वाद घेतले. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

‘प्रतीक ब्रिगेड’चा नवा अध्याय
राजारामबापू साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी १३ संचालक तरुण तसेच नवे चेहरे व उच्चविद्याविभूषित आहेत.

प्रतीक पाटील यांच्या भावी राजकीय जीवनाची ही सुरुवात मानली जात आहे. आमदार जयंत पाटील यांनीही अशीच सुरुवात केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT