Pratap Hogade Passed Away : Kolhapur Pratap Hogade : जेष्ठ वीज तज्ज्ञ व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे वय (74) यांचे सोमवारी (ता.18) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने इचलकरंजीत निधन झाले.
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जात होते. होगाडे यांनी वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आवाज उठवला. खेड्यातील शेतकऱ्यांसाठी मुंबईच्या धर्तीवर वीज धोरण राबवण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. २००० पासून महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे ते अध्यक्ष होते. ते २०१५ पासून राज्य शासनाच्या कृषिपंप वीजवापर सत्यशोधन समितीचे सदस्य होते.
महाराष्ट्रातील शेतकरी, यंत्रमागधारक, लघुउद्योजक, शेतमजूर, कामगार, छोटे घरगुती व व्यापारी वीजग्राहक अशा राज्यातील अंदाजे २ कोटी हून अधिक सर्वसामान्य वीजग्राहकांच्या हितासाठी व न्याय्य हक्कासाठी लढा दिला. संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी रस्त्यावरील आंदोलने केली.
वीज आयोगासमोर हजारोंच्या संख्येने हरकती देवून न्यायालयीन लढाईही सातत्याने केली . यामुळे अनेक सकारात्मक निर्णय झाले. वीज वहन व वितरण गळती आकार, सिंगल फेजिंग योजना, कृषी पंप वीज बिलातील तफावत, विसर वाढव अनुदानातील नेमकेपणा आदी सह कृषी औद्योगिक व घरगुती वीज वापरावर सातत्याने लिखाण, आंदोलन करून वीस ग्राहकांसाठी लढा दिला. त्याचबरोबर विविध पक्षांचे प्रमुख म्हणूनही त्यांनी सार्वजनिक क्षेत्रांमध्ये एक वेगळा ठसा उमटवला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.