Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : आमदार प्रकाश आवाडे आणि स्वाभिमानी महिला आघाडीत खडाजंगी, आवाडेंना महिलांचे आव्हान

Prakash Awade : आमदार प्रकाश आवाडे आणि महिला पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याने काही काळ वातावरण तणावाचे झाले.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Rate : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून ऊस दरावरून संघर्ष सुरू आहे. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना खर्डा भाकरी आंदोलन सुरू आहे.

आज(ता.११) भाऊबीजेनिमीत्त कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व हातकंणगले तालुक्यातील महिलांनी खर्डा भाकरी देवून ओवाळणी करण्यास गेले असता आमदार प्रकाश आवाडे आणि महिला पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याने काही काळ वातावरण तणावाचे झाले.

यावेळी स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार व कारखानदारांनी वाऱ्यावर सोडले आहे. आंदोलनात तोडगा न काढल्याने व शेतकऱ्यांची दिवाळी रस्त्यावर गेली यामुळे दिपावली भाऊबीज निमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने आमदार आवाडे यांना खर्डा भाकरी देवून ओवाळणी करण्यात आली.

दरम्यान आमदार आवाडे यांनी महिलांशी उध्दट उत्तरे देत तुम्ही चुकीच्यावेळी आंदोलने करत आहात. आम्हाला पैसे द्यायला जमत नाही. दंगा करायचं नाही एकट बोलायच. यावेळी सोबत गेलेल्या कार्यकर्त्यांना आत डावात ये बाजूला का राहिला आहेस अशा पध्दतीने मगरूरीने बोलून महिलांना परत पाठविले असल्याची माहिती सुवर्ण अपराज यांनी माहिती दिली.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही खर्डा भाकरी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार व कारखानदारांनी वाऱ्यावर सोडले आहे. आंदोलनात तोडगा न काढल्याने व शेतकऱ्यांची दिवाळी रस्त्यावर गेली यामुळे दिपावली भाऊबीज निम्मीत्त स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने आमदार खासदार लोकप्रतिनिधींना खर्डा भाकरी देवून ओवाळणी करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल तालुक्यातील महिलांनी खर्डा भाकरी देवून ओवाळणी केली. यावेळी महिला आघाडीच्यावतीने पालकमंत्री मुश्रीफ यांना लवकरात लवकर ऊस दराचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT