Agriculture Electricity Connection agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : रब्बी हंगामाला वीजपुरवठ्याचा खोडा

Agriculture Electricity : रब्बीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणी रब्बीची पिके ताशी लागली असून त्यांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. शेतीला रात्री वीज पुरवठा केला जात आहे.

Team Agrowon

Washim News : शासनाने मध्यम व लघू प्रकल्पाची निर्मिती केली असून सिंचनाचा अनुशेष जवळजवळ भरून काढला आहे. परंतु त्या प्रमाणात शेतीसाठी लागणाऱ्या विजेची सुविधा निर्माण केली नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. किमान १२ तास व दिवसा वीज देण्याची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.

रब्बीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणी रब्बीची पिके ताशी लागली असून त्यांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. शेतीला रात्री वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. शासनाने लघू व मध्यम प्रकल्पाची निर्मिती करून सिंचनाचा अनुशेष जवळजवळ भरून काढला असला तरी त्या प्रमाणात शेतकऱ्यांना विजेची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

या वर्षी पावसाळा भरपूर प्रमाणात झाल्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. परतीचा पाऊस कुठे कमी तर कुठे अधिक पडल्यामुळे रब्बीच्या पेरण्या मागे पुढे झाल्या आहेत. गहू, हरभरा, करडई, मका, ज्वारी, चिया सीड्स ही रब्बीतील प्रमुख पिके आहेत.

या पिकांच्या पेरण्या आटोपल्या असून ही पिके ताशी लागली आहेत. रब्बी पिकांसाठी पाणीसाठा आहे. परंतु, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रब्बी हंगामाच्या सुरुवातीला विजेची समस्या कायमच आहे. रब्बी हंगामातही शेतीला केवळ आठ तास वीजपुरवठा केला जातो.

रात्रीला वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शेतीला किमान बारा तास व दिवसा विजपुरवठा देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.

वाडीरायतळ प्रकल्प पूर्ण होऊन जवळपास दहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. या प्रकल्पामुळे ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. जवळ उपकेंद्र नसल्यामुळे चिखली उपकेंद्रावरून वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे वीज सुरळीत मिळत नाही.
- घनश्याम मापारी शेतकरी, मोहजा इंगोले, ता.रिसोड. जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture MSP : ‘एमएसपी’ला हवी कायदेशीर मान्यता

Turmeric Market : हिंगोलीत हळदीला मिळतोय ११५५० ते १४१०० रुपयांचा दर

Sugarcane Season 2024 : मराठवाड्यात पाच जिल्ह्यांतील १८ पैकी ९ कारखाने सुरू

Cold Weather Update : राज्यात गारठा वाढला

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

SCROLL FOR NEXT