Water Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage in Nanded : नांदेडला ३३ कोटी रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा

नांदेड जिल्ह्यात उन्हाची चाहूल लागताच प्रशासनाच्यावतीने ग्रामीण तसेच नागरी भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी टंचाई कृती आराखडा सादर करते.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात उन्हाची चाहूल लागताच प्रशासनाच्यावतीने ग्रामीण तसेच नागरी भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (Water Management) करण्यासाठी टंचाई कृती आराखडा सादर करते. यंदा टंचाईची तीव्रता नसली तरी ग्रामीण भागासाठी जानेवारी ते जूनसाठी टंचाई निवारण ३३ कोटींचा संभाव्य कृती आराखडा शासनाला सादर केला आहे.

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नागरी भागासह ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. टंचाई निवारणार्थ शासन वेगळ्या स्वरूपाचे उपाययोजना आखून नागरिकांसह जनावरांना पाणी उपलब्ध करून देते.

यामध्ये नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजना विशेष दुरुस्ती करणे, पूरक नळ योजना घेणे, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती करणे, खाजगी विहीर अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, प्रगतिपदावरील उपाययोजना पूर्ण करणे आदी उपाययोजना राबविल्या जातात.

जिल्ह्यातील सोळा तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांना जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी २७ कोटी ९३ लाख रुपये, तर एप्रिल ते जून या काळात सहा कोटी ३१ लाख रुपये खर्च होतील असा संभाव्य कृती आराखडा शासनाला सादर केला आहे.

सात टँकरची मागणी

मागील पावसाळ्यात झालेल्या सरासरीच्या १३६ टक्के पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच जलस्रोत पूर्णपणे भरले होते. तसेच जमिनीमध्ये पाण्याचा साठा वाढल्याने यंदा टंचाईची तीव्रता जाणवत नाही.

माहूर तालुक्यातील वानोळा येथे एक तर कंधार तालुक्यातील कुरुळा येथे सहा टँकर अशा सात टँकरसाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. तसेच काही ठिकाणी खासगी विहीर, कूपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षातून मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT