Maghi Vari  Agrowon
ॲग्रो विशेष

Pandharpur Maghi Wari : माघवारीनंतर पंढरपुरात स्वच्छता मोहीम

Pandharpur Wari : उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Pandharpur News : पंढरपूर ः पंढरपुरात माघ एकादशी सोहळा पार पडला. यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले. या यात्रेसाठी सुमारे ३ ते ४ लाख वारकरी-भाविक दर्शनासाठी आले. आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली.

माघी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपूर रोड, मंदिर परिसर व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यात्रेनंतर बहुतेक द्वादशी दिवशी शहरातील कचरा उचलण्याचे काम हाती घेण्यात येते. परंतु यावर्षी वाहने प्रदक्षिणा मार्ग व इतर ठिकाणी जाण्यास अडचण नसलेने मठामध्ये व परिसरात साठलेला कचरा गोळा करण्याचे काम लगेच हाती घेण्यात आले आहे.

एकादशीच्या रात्रीपासूनच २४ तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम चालू केले आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील सर्व कचरा उचलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या कामी शहरासह ६५ एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपूर रोड, मंदिर परिसर, शहर उपनगर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी ७०० ते ८०० स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत.

मात्र बऱ्याच ठिकाणी भाविकांनी उघड्यावर खरकटे अन्न व इतर घाण केल्याने दुर्गंधी पसरू नये, म्हणून कचरा उचलण्याचे कामा बरोबरच नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जंतुनाशक पावडर फवारणी व ४ ब्लोअर मशिनने बायो कल्चर फवारणी हाती घेतली आहे. त्यामुळे झालेल्या घाणीचे डीकंपोस्टिंग होऊन दुर्गंधी नष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत ४१ घंटागाडी, आरोग्य विभागाकडील ६ टिपर, ३ कॉम्पॅक्टर, ६ डंपिंग ट्रॉलिने व जेसीबीच्या सहाय्याने ८०० कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छता करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेबद्दल नागरिकांनी सामाधान व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT