Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : ‘सहकारमहर्षी’च्या लाखाव्या साखर पोत्याचे पूजन

Sugar Production : सहकारमहर्षी साखर कारखान्यात उत्पादित झालेल्या १ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : येथील सहकारमहर्षी साखर कारखान्यात उत्पादित झालेल्या १ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

सहकारमहर्षी'' शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम शुक्रवारी (ता.१५) सुरू झाला असून, गुरुवार (ता.२८) अखेर १ लाख २४ हजार ८६० मे. टन उसाचे गाळप होऊन १ लाख ०६ हजार साखर पोत्याचे उत्पादन झाले असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.

सरासरी साखर उतारा ९.३५ टक्के व आजचा साखर उतारा ९.४० टक्के आहे. सध्या प्रतिदिवस ८५०० मे.टन याप्रमाणे उसाचे गाळप होत आहे. सहवीज निर्मिती प्रकल्प गुरुवारी (ता.७) सुरू झाला असून, १ कोटी ०९ लाख ४५ हजार ०९० युनिट वीज निर्माण झाली आहे.

त्यामधून ६६ लाख ४६ हजार २१४ युनिट वीज विक्री केली आहे. तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टिलरीमध्ये १८ लाख ९४ हजार २१९ लिटर्स रेक्टिफाईड स्पिरीट, १६ लाख ७८ हजार ४५४ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले आहे.

साखर पोती पूजनास उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदीप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक-रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT