Pomegranate Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate crop : सातमाने येथे बागेतून दोन लाखांच्या डाळिंबाची चोरी

Nashik news : नाशिकच्या शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे राहिले आहे. आधीच अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आलेल्या असल्याने पुन्हा शेतकरी भीतीच्या सावटाखाली आलेला आहे. त्यात कसाबसा वाचविलेला शेतमाल दोन पैसे मिळवून देणारा ठरत असल्याने त्यावरच चोरडे डल्ला मारत आहे.

Team Agrowon

Pomegranate crop theft : जिल्ह्यातील कसमादे भागात डाळिंब पिकामुळे गेल्या दोन दशकांत समृद्धीची लाली खुलवली आहे. मात्र सातमाने (ता. मालेगाव) येथे प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या डाळिंब पिकावर चोरट्यांनी डल्ला मारला असून शेतातून दोन लाखांचे डाळिंब चोरट्यांनी लंपास केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातमाने शिवारात समाधान जाधव यांची ३ एकर डाळिंब लागवड आहे. त्यापैकी दीड एकरावरील गट क्रमांक २३५ मध्ये डाळिंब बागेतून चोरट्यांनी ४०० डाळिंबांच्या झाडावरून काढणीयोग्य होत असलेले अंदाजे २०० क्रेट डाळिंब चोरुन नेले. प्रतिकिलो अंदाजे ५० रुपये भाव गृहीत धरल्यास प्रमाणे सुमारे दोन लाख रुपये किमतीचा डाळिंब लंपास करण्यात आला. १४ जुलैच्या रात्री दहा ते १५ जुलैच्या सकाळी सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला.

चोरट्यांनी डाळिंब चोरी व वाहून नेण्यासाठी वाहनाचा वापर केला असावा. समाधान जाधव यांच्या तक्रारीवरून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलकट डाग व मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे लागवडी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. तरीही गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात सातत्य ठेवले आहे.

या हंगामात डाळिंब काढणीचे काम सुरू असून सध्या राज्यभरात ७५ ते १०० रुपये प्रतिकिलो सरासरी दर मिळत आहे. मात्र, चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT