Pomegranate Orchard  Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Orchard Fire : शॅार्टसर्किटमुळे डाळिंब बाग जळाली

Electricity Short Circuit : सांगोला तालुक्यातील वाकी घेरडीसह परिसरातील महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील तार खूप जीर्ण झाल्या असून, त्या केव्हाही तुटतात.

Team Agrowon

Solapur News : डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन व डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन वाकीघेरडी (ता. सांगोला) येथील सुरेश झिंजुरटे या शेतकऱ्याची डाळिंब बाग जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

सांगोला तालुक्यातील वाकी घेरडीसह परिसरातील महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील तार खूप जीर्ण झाल्या असून, त्या केव्हाही तुटतात. तारांचे घर्षण होऊन आगीच्या घटना घडल्याने शेतातील पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे अनेक वेळा आर्थिक नुकसान झाले आहे.

तसेच विद्युतपुरवठा खंडित झाल्याने विद्युत प्रवाह पुन्हा सुरू करण्यासाठी एक दोन दिवसांचा कालावधी लागत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन व डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन वाकी (घेरडी, ता. सांगोला) येथील सुरेश झिंजुरटे या शेतकऱ्याची डाळिंब बाग जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) दुपारी तीन वाजणेच्या सुमारास घडली.

या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. डाळिंब बाग जोपासण्यासाठी झिंजुरटे कुटुंबीयांनी खूप मेहनत घेतली होती.

उन्हातान्हात कष्ट तर केलेच, शिवाय झाडा़ंना फळधारणा व्हावी, म्हणून रासायनिक खते व औषधासाठी उसनवारी करून मोठा खर्च केला होता. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT