Lok Sabha Election 2024  Agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचे आज अंतिम टप्प्यातील मतदान

Election Update : लोकसभा निवडणुकीचे अंतिम म्हणजे सातव्या टप्प्यातले मतदान आज (ता. १) पार पडणार आहे.

Team Agrowon

New Delhi News : लोकसभा निवडणुकीचे अंतिम म्हणजे सातव्या टप्प्यातले मतदान आज (ता. १) पार पडणार आहे. आठ राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदार संघांत हे मतदान होईल. शेवटच्या टप्प्यातले मतदान पार पडल्यानंतर मंगळवारी (ता. ४) लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ९०४ उमेदवारांचे भवितव्य आज इलेक्ट्रॉनिक मशिनमध्ये बंद होईल. उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदार संघात मोदी यांचा मुकाबला कॉंग्रेसच्या अजय राय यांच्याशी होत आहे. अंतिम टप्प्यात ज्या अन्य प्रमुख नेत्यांचे भवितव्य निश्चित होणार आहे.

त्यात कंगना राणावत, रवी किशन, अनुराग ठाकूर, महेंद्रनाथ पांडेय, रविशंकर प्रसाद, निशिकांत दुबे, रामकृपाल यादव, तरणजित सिंह संधू, रवणीत सिंह बिट्टू, सीता सोरेन, परनीत कौर (सर्व भाजप), अभिषेक बॅनर्जी, सुदीप बंडोपाध्याय (तृणमूल कॉंग्रेस), अनुप्रिया पटेल (अपना दल), मनीष तिवारी, विक्रमादित्य सिंह, चरणजित सिंह चन्नी, आनंद शर्मा (सर्व कॉंग्रेस) मिसा भारती (राजद), हरसिमरत कौर बादल (अकाली दल) यांचा समावेश आहे.

सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि पंजाब मधील प्रत्येकी १३, पश्‍चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, ओडिशामधील ६, हिमाचल प्रदेशातील ४, झारखंडमधील ३ जागांसाठी तसेच केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंडीगडमध्ये मतदान होणार आहे.

कोण जिंकणार; उत्सुकता शिगेला

साऱ्या देशाचे लक्ष या निकालाकडे लागले असून भाजपप्रणित ‘रालोआ’ तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक करणार की दहा वर्षांच्या वनवासानंतर काँग्रेसप्रणित आघाडीचे सत्तेत येण्याचे स्वप्न साकार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT