Mhaisal Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Scheme : विस्तारित म्हैसाळच्या कामासाठी सुरू झाला राजकीय श्रेयवाद

Mhaisal Scheme Work : जत तालुक्यातील पूर्व भागातील कायमचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत १४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

Team Agrowon

Sangli News : जत तालुक्यातील पूर्व भागातील कायमचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत १४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह पाणी संघर्ष समितीही रस्त्यावर उतरू लागली आहे. आता यामध्ये श्रेयवाद घेण्यासाठी राजकारणही सुरू झाले असल्याचे चित्र आहे.

जत तालुक्यातील पूर्व भागात म्हैसाळचे पाणी मिळावे ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. परंतु या मागणीकडे आजपर्यंत दुर्लक्षच झाले आहे. गतवर्षी विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी १९३० कोटी निधीची मंजुरी मिळाली. त्यापैकी ९८१ कोटींची कामे मंजूर झाली. मूळ म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीनच्या संतुलन जलाशयांमधून पाणी उचलून ५७ किलोमीटरवरील येळदरी येथे जमिनीपासून ७४० मीटर उंचीवर पोहोचविले जाणार आहे. विस्तारित म्हैसाळचे काम जूनपासून सुरू झाले. आजअखेर १४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.

विस्तारित म्हैसाळचे काम युद्धपातळीवर सुरू असून टप्प्याटप्प्याने सुरू आहे. जत तालुक्यात ६ ठिकाणी, तर मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांत पाच ठिकाणी काम सुरू आहे. मात्र, जत तालुक्याच्या पूर्व भागातील विविध संघटना, पाणी संघर्ष समितीकडून कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी उर्वरित निविदा काढण्याची मागणी करू लागले आहेत.

एकाच वेळी निविदा काढून एकाच सर्वत्र काम सुरू केले तर काम लवकर पूर्ण होईल, यासाठी शेतकरी आणि संघटना रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. एकाबाजूला राष्ट्रवादी (अजित पवार गट) भाजप, काँग्रेसचे लोकप्रतिनिधीही आक्रमक झाले असून आंदोलनही करत आहेत.

दरम्यान, त्याच पक्षातील नेते पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात, की हा तालुक्याच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामध्ये कोणीही राजकारण करू नये. मुळात निवडणूक आली की म्हैसाळ हाच मुद्दा घेऊन आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी राजकारण केले. त्यातूनच खासदार, आमदार निवडणून आले. आताही लोकप्रतिनिधींची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे श्रेयवादाचे राजकारण बाजूला ठेवून योजना कशी लवकर पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT