POCRA Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA Project : ‘पोकरा’तून साधणार शेती, शेतकरी समृद्धी

Sustainable Agriculture : या योजनेतून शेती व शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीमाल उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जोखीम वाढली आहे.

Team Agrowon

Amaravati News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) २१ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. यामध्ये विदर्भातील ४ हजार २८४ गावांचा समावेश असून आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील २ हजार ४४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ५ हजार २८४ गावांमध्ये योजना राबविण्यात आली.

या योजनेतून शेती व शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीमाल उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जोखीम वाढली आहे. याचा विचार करून पोकरा योजनेची आखणी करण्यात आली असल्याचे अमरावतीच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी सांगितले.

या योजनेसाठी विदर्भातील ४ हजार २८४ गावांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांतील ६ हजार ९५९ गावांमध्ये योजना राबविण्यात येणार आहे. गावांची निवड करताना पडणारा पाऊस, उत्पादकता, पाण्याची स्थिती, ग्रामस्थांची आर्थिक स्थिती, समस्या या बाबींचे सर्वेक्षण करण्यात आले.

या निकषात कमी ठरलेल्या गावांची या योजनेसाठी निवड करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले. या सर्व गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात आली.

अकरा सदस्यीय समितीत ग्रामसेवक सदस्य सचिव आहेत. समितीने गावांतील कामांचे सूक्ष्म नियोजन केले आहे. ग्राम कृषी विकास समितीला शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कामांना मंजुरीचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये शेतीविषयक नवे संशोधन, पाण्याचा काटकसरीने वापर, शेतीतील कर्ब नियंत्रण, कार्बन क्रेडिट सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे.

योजनेतील महत्त्वपूर्ण बाबी

पोकरा योजनेतील महत्त्वपूर्ण बाबींमध्ये मृद व जलसंधारण व भूजल पुनर्भरण, पाण्याचा कार्यक्षम वापर, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, फळबाग व बांबू लागवड, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, कृषिपूरक व्यवसाय, काढणीपश्चात व्यवस्थापन, कृषिमूल्य साखळीचे बळकटीकरण, सेंद्रिय व जैविक निविष्ठा तयार करणे, बियाणे व धान्य प्रक्रिया उद्योग युनिट आदींचा समावेश आहे.

जिल्हानिहाय समाविष्ट गावे

आत्महत्याग्रस्त जिल्हे ः अकोला ः १४९, अमरावती ः ४५४, बुलडाणा पश्चिम विदर्भ : ३१०, यवतमाळ ः५५९, वाशीम ः १८९, वर्धा ः ३८३, पूर्व विदर्भ ः भंडारा ः २९१, चंद्रपूर ः ५६१, गडचिरोली ः ५३२, गोंदिया ः २९३, नागपूर ः ५६३

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कामे केल्या जाणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील ४५४ गावांची निवड यासाठी करण्यात आली असून तेथे पाणलोट व हवामान आधारित कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने प्रत्येक गावात ग्राम कृषी विकास समिती स्थापन कऱण्यात आली आहे.
-राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT