PM Kisan Installment agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : देशभरातल्या शेतकऱ्यांना दिवाळी भेट ! किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता जाहीर

PM Kisan Yojana Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता जारी केला आहे. डीबीटीद्वारे देशातील ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवण्यात आले आहेत.

Swapnil Shinde

PM Kisan 15th-instalment : देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (pm kisan sanman nidhi) १५ वा हप्ता जारी केला आहे. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमादरम्यान (PM Narengra modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ व्या हप्त्याचे (15th-instalment) पैसे डीबीटीद्वारे करोडो शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवले आहेत. किसान सन्मान निधी योजनेचे २ हजार रुपये ८ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.

यापूर्वी पीएम किसानच्या हप्त्याचा लाभ १२ कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता. यावेळी योजनेसाठी पात्रतेचे निकष पूर्ण न केल्याने तब्बल ४ कोटी शेतकऱ्यांना नवा हप्ता मिळणार नाही. त्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा झटका समजला जात आहे. १५ वा हप्ता (Maharashtra) महाराष्ट्रातील ८५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १५ व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. 

यापूर्वी जुलैमध्ये किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता रिलीज केला होता. त्यातही सुमारे १८ हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये वर्ग करण्यात आले. या योजनेंतर्गत सरकार दर वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये जमा केले जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये PM-किसान सन्मान योजना लाँच करण्यात आली. तेव्हा तिचे फायदे फक्त अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्याना होत होता. यामध्ये २ हेक्टरपर्यंत एकत्रित जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश होता. जून २०१९ मध्ये, योजना सुधारित करण्यात आली आणि सर्व शेतकरी कुटुंबांसाठी विस्तारित करण्यात आली. मात्र, अजूनही काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.

पीएम किसानमधून वगळण्यात आलेल्यांमध्ये संस्थात्मक जमीनधारक, घटनात्मक पदांवर असलेले शेतकरी कुटुंब, राज्य किंवा केंद्र सरकारमधील कार्यरत किंवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारी स्वायत्त संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी देखील समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त डॉक्टर, अभियंते आणि वकील यांसारखे व्यावसायिक तसेच मासिक १०,००० रुपयांपेक्षा जास्त निवृत्ती वेतन असलेले निवृत्त निवृत्तीवेतनधारक आणि ज्यांनी मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरला आहे त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT