Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Development : ‘आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे’

Watershed Development : पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात झालेली शेततळी शेतकऱ्यांना निश्चितच वरदान ठरणार आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News : पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात झालेली शेततळी शेतकऱ्यांना निश्चितच वरदान ठरणार आहेत. प्रकल्पाचा कालावधी जरी संपत आलेला असला तरी खरे काम हा प्रकल्प संपल्यानंतरच सुरू होणार आहे. आदिवासी समुदाय विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, त्यासाठी त्यांना सामावून घ्यावे, असे आवाहन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले.

अकोले तालुक्यातील कोहणे, विहीर, तळे, शिंदे, कोथळे, वागदरी, लव्हाळी ओतूर, लव्हाळी कोतुळ, पाचनई या गावांत पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत पाणलोट राबवला जात आहे.

पाचनई येथे पाणलोट यात्रेचा प्रारंभ आमदार लहामटे यांच्या हस्ते झाला. पर्यटन तज्ज्ञ डॉ. विशाल लाहोटी, प्रकल्प कार्यान्वयिन यंत्रणा प्रमुख किरण मांगडे, राजाराम साबळे, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, सरपंच भास्कर बादड,

कृषी सहायक तेजश्री कोरडे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी कपिल बिडगर, गोविंद कुल्लाळ, बाळासाहेब बांबळे, नारायण घुले, बाळनाथ सोनवणे आदी उपस्थित होते. नागरिकांना जलसंधारण शपथ दिली. प्रास्ताविक किरण मांगडे यांनी केले. राजाराम साबळे यांनी आभार मानले.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक प्रकल्पातून अकोले तालुक्यातील नऊ गावांत जलसंधारण उपक्रम राबवला आहे. दोन वर्षांत ९ गावांत १६३ शेततळी पूर्ण झाली. या वर्षातही अधिक कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

- किरण मांगडे, प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा प्रमुख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT