PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Installment: PM Kisan चा २० वा हप्ता वेळेवर मिळवायचा? तर ई-केवायसी आणि आधार लिंक अनिवार्य!

E-KYC Mandatory: जून २०२५ मध्ये येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या २० व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, हा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि आधार लिंक अनिवार्य आहे.

Roshan Talape

Pune News: फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेल्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता केव्हा जमा होणार याकडे देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याआधीचा १९ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये दिला गेला होता. त्यामुळे २० वा हप्ता ४ महिन्यांनंतर म्हणजेच जून २०२५ मध्ये येण्याची शक्यता आहे. २० वा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. जर ई-केवायसी केली नसेल, तर आपले नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते आणि हप्ता मिळणार नाही.

या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधित छोट्या गरजांसाठी आर्थिक मदत देणे असा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत आणि त्यांना त्यांच्या पिकांसाठी आवश्यक असलेल्या बी-बियाणे,खते आणि वस्तू खरेदी करण्यास मदत होते.

परंतू यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे आणि पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज भासत आहे. अशावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो. त्यामुळे खरीपात लागणाऱ्या खर्चासाठी या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना फायद्याचा ठरणार आहे. यामुळेच देशभरातील शेतकऱ्यांचे या योजनेच्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे.

सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना ६००० रुपये आर्थिक मदत देते, जी तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजे दर ४ महिन्यांनी २००० रुपयांप्रमाणे दिली जाते. हे पैसे प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे दिले जातात. परंतू यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली, तरीही हा हप्ता आलेला नाही. 

हा हप्ता जून २०२५ च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे. त्यापूर्वी, हप्ता वेळेवर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी, बँकचे खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती व लाभार्थी यादी तपासण्यासाठी www.pmkisan.gov.in या पोर्टलवर भेट द्यावी.

हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य:

२० वा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. जर ई-केवायसी केली नसेल, तर आपले नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते आणि हप्ता मिळणार नाही.

ई-केवायसी करण्याचे ३ सोपे मार्ग:

ऑनलाईन पोर्टलद्वारे:

www.pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

‘Farmers Corner’ मध्ये ‘e-KYC’ वर क्लिक करा.

त्यानंतर आधार क्रमांक टाका व OTP द्वारे प्रक्रिया पूर्ण करा

मोबाईल ॲपद्वारे:

PM-KISAN ॲप डाऊनलोड करा.

फेस अथवा आधार प्रमाणीकरण करून ई-केवायसी पूर्ण करा.

किंवा नजीकच्या CSC केंद्रावरून (ग्रामीण भागासाठी उपयुक्त) जर तुमचा मोबाईल आधारशी लिंक नसेल, तर CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक e-KYC पूर्ण करा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cultivation: अमेरिकेत सोयाबीन लागवड वाढणार

Jowar Arrival Increase: अहिल्यानगरला ज्वारीच्या आवकेत वाढ

Krushi Mitra Recruitment Scam: ‘कृषिमित्र’ नावाखाली बोगस भरतीचे पेव

Maharashtra Heatwave: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा कायम

Bordeaux Paste: फळझाडांसाठी बोर्डो पेस्ट घरच्या घरी कसे बनवावे?

SCROLL FOR NEXT