Agriculture Plowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Plowing : रणरणत्या उन्हातही नांगरटीची कामे जोरात

Summer Agriculture : सध्या रणरणते ऊन आहे, मात्र खरीप हंगामही तोंडावर आला. हंगामापूर्वी जमीन थोडी तापावी या हेतूने सध्या नांगरटीची कामे या भागात जोराने सुरू आहेत.

Team Agrowon

Buldhana News : सध्या रणरणते ऊन आहे, मात्र खरीप हंगामही तोंडावर आला. हंगामापूर्वी जमीन थोडी तापावी या हेतूने सध्या नांगरटीची कामे या भागात जोराने सुरू आहेत.शेतातील जवळपास सर्वच पिकांची काढणी झाली आहे. जेथे उन्हाळी पीक उभे दिसते त्याही ठिकाणी पुढील आठवड्यात हे काम आटोपणार आहे.

पावसाळ्यापूर्वी जमिनीची मशागत करण्यावर शेतकरी लक्ष केंद्रीत करीत असतात. प्रखर उन्हात जमिनीची नांगरणी केल्यास शेती चांगली तापते. खरीप हंगामात पिके जोमाने येतात. शेतात गवत होत नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

सध्या जमीन मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. जमीन नांगरणीसाठी जवळपास एकरी दोन हजार रुपये खर्च येतो. पाऊस पडल्यानंतर जमिनीची पुन्हा मशागत करावी लागते. कपाशी, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, कांदा, तीळ, मका, गहू आदी पिके निघून गेल्यानंतर जमिनीची नांगरणी करण्याची पद्धत आहे.

ओलिताच्या काही शेतांमध्ये अजूनही पिके असल्याने हिरवळ दिसून येते. परिसरातील बहुतांश शेतातील पिके निघून गेल्याने उन्हाच्या तडाख्यात नांगरणीची लगबग दिसून येते. सालगड्याचे भाव ७० ते ८० हजार रुपयापर्यंत पोहोचले आहेत. यामुळे शेती करण्याच्या खर्चात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अलीकडे उत्पादनातही घट येत असल्याने शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे.

बैलांच्या दावणी रिकाम्या

पारंपरिक पद्धतीची नांगरणी आता इतिहासजमा झाल्याचे दिसून येते. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोड्या होत्या. एका शेतकऱ्याच्या दावणीला दोन ते तीन बैल जोड्या दिसायच्या. बदलती शेती व महागाईमुळे बैल जोड्या जोपासणे जिकरीचे झाले आहे. खेड्यापाड्यात ट्रॅक्टरची संख्या वाढली. ट्रॅक्टरने बैलांच्या दावण्यांची जागा खाली केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Levels Drop: आठवडाभरात लघू प्रकल्पांत दोन टक्के, मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

Farm Road Issue: करमाळ्यातील शेतकऱ्यांचे बंद रस्ते तत्काळ मोकळे करा : नारायण पाटील

Agriculture Irrigation Management: सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आराखडा तयार करा

Cotton Rate: उद्योगांचा नफा कमी झाल्याने आयात शुल्क काढण्याची मागणी

Crop Damage Compensation: पावसाच्या नुकसानीपोटी ५.४० कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT