Banana Tissue Culture Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Plantation : उती संवर्धित रोपापासून केळी लावा

Tissue Culture Banana : केळी पिकाखाली संत्रा पाठोपाठ मोठे क्षेत्र असून अकोट, तेल्हारा आणि बार्शीटाकळी तालुक्यांमध्ये केळी मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

Team Agrowon

Akola News : केळी पिकाच्या गुणवत्तायुक्त घड निर्मितीसाठी केळीची लागवड उती संवर्धित रोपापासून करणे, रोपांच्या निवडीचे निकष, केळीच्या उत्पादनक्षम वाणांची निवड, जमीन तयार करून गादीवाफ्यावर रोपांची लागवड, पांढऱ्या मुळांची योग्य वाढ होण्यासाठी दुहेरी ठिबक नळ्यांचा वापर आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन उद्यानविद्या विषय विशेषज्ज्ञ गजानन तुपकर यांनी केले.

अकोला कृषी विज्ञान केंद्र आणि अकोट कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने ‘दर्जेदार केळी उत्पादन आणि कीड-रोग व्यवस्थापन तंत्र’ या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले.

या वेळी श्री. तुपकर बोलत होते. जिल्ह्यात केळी पिकाखाली संत्रा पाठोपाठ मोठे क्षेत्र असून अकोट, तेल्हारा आणि बार्शीटाकळी तालुक्यांमध्ये केळी मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हे लक्षात घेता हे प्रशिक्षण आयोजित केले होते.

श्री. तुपकर म्हणाले, की अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करताना खतांचे बेसल डोस तसेच विद्राव्य खतांचे महिनावार वेळापत्रक, सिंचन व्यवस्थापन, घड व्यवस्थापन करताना ९ ते १० फण्या ठेवून विरळणी करणे, निर्यातक्षम घड निर्मितीसाठी घड पिशव्यांनी झाकणे, घड फुगवणसाठी संजीवकांचा वापर इत्यादी अनेक पैलूंवर मार्गदर्शन केले.

पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. चारुदत्त ठिपसे यांनी केळी पिकांवरील महत्त्वाच्या किडी आणि रोगांबाबत माहिती दिली. कार्यक्रम सहायक दुष्यंत देशमुख यांनी केळी पिकामध्ये माती आणि पाणी परीक्षण कसे करावे, या विषयी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल अडाणी यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT