Fodder Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Crop : चारा पिकांचे ४७ हजार ९२७ हेक्टरवर नियोजन

Fodder Scarcity : चाराटंचाई भेडसावू नये, यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामात चारा पिकांचे नियोजन सुरू केले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : चाराटंचाई भेडसावू नये, यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामात चारा पिकांचे नियोजन सुरू केले आहे. यंदा खरिपात सरासरी ४७ हजार ९२७ हेक्टरवर चारा पिकांचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार असून, चाऱ्याची अडचण येणार नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी मॉन्सून हंगामात सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्याला चांगलाच आधार मिळाला आहे. पश्‍चिमेकडील तीन तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. इतर तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु इंदापूर, बारामती, शिरूर भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले होते.

त्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील पुरंदर, बारामती तालुक्यातील अनेक भागांत चाऱ्याची चांगलीच टंचाई आहे. उर्वरित तालुक्यांत काही प्रमाणात चारा उपलब्ध असला तरी हळूहळू तेथेही चाराटंचाई जाणवू लागली आहे. पुरंदरमध्ये फारसा चारा उपलब्ध नाही. या भागातून जूनमध्ये चारा छावण्यांची मागणी पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

सध्या पाणीटंचाईमुळे हिरव्या चाऱ्याची अनेक ठिकाणी टंचाई भासत आहे. त्यातच साखर कारखाने बंद झाल्याने उसाचे वाडे मिळणे बंद झाले आहे. जिल्ह्यात एकूण ११ लाख ४४ हजार ८९३ जनावरे आहेत. यात लहान सुमारे ३ लाख ४३ हजार ४६८, तर मोठी ८ लाख १ हजार ४२५ एवढी आहेत.

त्यासाठी दररोज सुमारे पाच हजार ८३९ टन हिरवा चारा आवश्यक आहे. तर महिन्याला एक लाख ७५ हजार १६९ टन सुका चारा आवश्यक असतो. परंतु सध्या हा चारा मिळणे अवघड झाले आहे. अंदाजे एक ते दीड लाख टन एवढाच चारा उपलब्ध आहे. हा चारा पुढील एक ते सव्वा महिना पुरेल एवढाच आहे. त्यानंतर पाऊस झाल्यास चारा उपलब्ध होईल, न झाल्यास चाऱ्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Fire Prevention Plan: वणव्यांच्या प्रतिबंधासाठी १३२ किलोमीटरची जाळरेषा

Indian Journalism: बारकावे शोधून पत्रकारिता करावी: ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ

Agri College Administration Changes: कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य महानंद माने यांची उचलबांगडी

Water Conservation: भूजल पुनर्भरणाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे : नितीन गडकरी

Ai in Farming: प्रतापराव पवार यांचे कृषी ‘एआय’ वापराचे काम उल्लेखनिय : गडकरी

SCROLL FOR NEXT