Satara News : महाराष्ट्र शासन पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे, कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत केलेल्या पाहणीत कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणने संपूर्ण महाराष्ट्रातून १९ वा आणि कोल्हापूर विभाग व सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या प्रकल्पांतर्गत स्मार्ट रँकिंग लिस्ट तयार करताना बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधा व इतर सेवा सवलती, आर्थिक व वैधानिक कामकाज यासह अन्य कामकाजविषयक निकष विचारात घेऊन सहकार व पणन विभागाकडून स्वतंत्ररीत्या ऑनलाइन मूल्यांकन करून राज्य व विभागस्तरीय रॅकिंग लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये फलटण बाजार समितीने आपले कामकाज व शेतकरी सेवेतील अव्वल स्थान सिद्ध केले आहे.
फलटण- खंडाळा तालुक्याचे माजी आमदार विजयसिंह मालोजीराव नाईक-निंबाळकर यांची सत्शील, दूरदृष्टी व लोकोद्धाराची प्रेरणा घेऊन फलटण तालुक्यातील आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नेतृत्व, मार्गदर्शन आणि आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथे शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करीत असल्याचे बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष भगवानराव होळकर व संचालक मंडळ यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी रीतीने राबविण्यात बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत उपयुक्त व प्रेरणादायी ठरली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.