Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Canal Damage : पेनटाकळी कालव्याची होणार दुरुस्ती

Canal Irrigation : पेनटाकळी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच आरसीसी ट्रफचा नवीन कॅनॉल बांधकाम करून उर्वरित गावांना पाणी सोडणे तसेच इतर मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते.

Team Agrowon

Buldana News : पेनटाकळी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच आरसीसी ट्रफचा नवीन कॅनॉल बांधकाम करून उर्वरित गावांना पाणी सोडणे तसेच इतर मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते.

याची दखल घेत प्रशासनाने लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून आश्‍वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा आक्रमक होण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

पेनटाकळी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच आरसीसी ट्रफचा नवीन कॅनॉल बांधकाम करून उर्वरित गावांना पाणी सोडणे, गेल्या दोन वर्षांपासून रायपूर, सावत्रा, सोनारगव्हाण, मोसंबेवाडी, मिस्किनवाडी, मारोतीपेठ, जानेफळ, निम्बा, लोणीकाळे, गोमेधर, उटी, घाटनांद्रा, वरवंड, बोथा, बार्डा येथील शेतकऱ्यांना पाणी न सोडल्यामुळे त्यांना ४ हजार ४४८ हेक्टरची नुकसान भरपाई देणे तसेच कालवा फुटून पेनटाकळी, ब्रह्मपुरी, रायपूर, पाचला, रायपूर या गावच्या शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करावी या मागण्यासाठी पेनटाकळी प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले. मात्र, काहीवेळ या वेळी संबंधित विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता.

रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संपर्क करीत माहिती दिली. यानंतर संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आंदोलक आक्रमक होऊन जलाशयात उतरले व जलसमाधी घेण्यावर ठाम होते. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत अधिकाऱ्यांना पाचारण करीत अखेर सर्व मागण्या मंजूर केल्या. त्यामुळे सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. जर प्रशासनाने सदर कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली तर नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना घेऊन धडक देऊ
--डाॕ. ज्ञानेश्वर टाले, जिल्हाध्यक्ष

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT