Old Pension Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Old Pension Scheme : समितीच्या अहवालानुसार पेन्शन देणार

सामाजिक सुरक्षितता, सेवानिवृत्तीनंतर जे लाभ त्यांना हवे आहे, त्या संदर्भातील तत्त्व आम्ही मान्य केले आहे.

Team Agrowon

Nagpur News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासंदर्भात एक समिती नेमली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात येईल, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी संप मागे घेतल्याबद्दल सर्व संघटना आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. संवादातूनच मार्ग निघत असतो आणि तो संवाद आम्ही केला, असेही ते म्हणाले.

नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, की शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला, ही आनंदाची बाब आहे. सोमवारी (ता. २०) दुपारी माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली होती.

आम्ही कुठलाही अहंभाव न बाळगता कर्मचाऱ्यांची भूमिका जाणून घेतली. आडमुठी भूमिका कधीच घेतली नाही. आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांचे हित पाहणारेच आहोत. सामाजिक सुरक्षेची भूमिका तत्त्व म्हणून आम्ही आधीच मान्य केली होती.

आता चर्चेचे मुद्दे निश्चित करून समितीपुढे ठेवण्यात आले आहेत. समिती त्यावर निर्णय घेईल. पहिल्या दिवशीपासूनच आम्ही संवादाचा प्रयत्न करीत होतो.

आज त्यांनी संप मागे घेतला, याचा आनंद आहे. समितीला तीन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे कालबद्ध वेळेतच समिती आपला अहवाल देईल.

सामाजिक सुरक्षितता, सेवानिवृत्तीनंतर जे लाभ त्यांना हवे आहे, त्या संदर्भातील तत्त्व आम्ही मान्य केले आहे. आता त्याची अंमलबजावणी कशी करायची या संदर्भात ही समिती काम करणार आहे.

आम्ही पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना सांगितले होते, की जो समितीचा अहवाल असेल त्यामध्ये आपण कुणालाही वगळणार नाही. सर्वांना सोबत घेऊनच आपल्याला चालायचे आहे. त्यामुळे समितीने घेतलेला निर्णय सर्वांना लागू होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT