PDKV Akola  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Idol Award : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा मानाचा सन्मान: २०२५ साठी ‘आयडॉल्स’ची निवड

PDKV Akola : कृषी विद्यापीठाच्या आणि इतर समांतर संस्थांच्या सहयोगातून स्वतः व्यावसायिक शेती साकारणाऱ्या आणि सोबत इतरांना मार्गदर्शक ठरलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांचा कार्य परिचय इतरांना होण्याच्या उद्देशाने विद्यापीठातर्फे ‘आयडॉल’ निवडले जातात.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२५ या दोन महिन्यांसाठी आयडॉल जाहीर करण्यात आले आहेत. शेतकरी गटात विमलादेवी वाघूजी गेडाम यांना ‘शेतकरी आयडॉल’ तर, डॉ. मोहन बेलगमवार यांना ‘कृषी पदवीधर आयडॉल’ म्हणून जाहीर करण्यात आले.

कृषी विद्यापीठाच्या आणि इतर समांतर संस्थांच्या सहयोगातून स्वतः व्यावसायिक शेती साकारणाऱ्या आणि सोबत इतरांना मार्गदर्शक ठरलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांचा कार्य परिचय इतरांना होण्याच्या उद्देशाने विद्यापीठातर्फे ‘आयडॉल’ निवडले जातात. निवड केलेल्यांचा परिचय देण्यासाठी त्यांचे होर्डिंग विदर्भातील जिल्ह्यात विद्यापीठाच्या प्रक्षेत्रांवर लावण्यात येत असतात.

कृषी अभ्यासक्रम पूर्ण करीत त्याचा व्यावसायिक वापर करून स्वतः कृषी उद्योजक, निर्माता, मार्गदर्शक, शास्त्रीय दृष्टिकोनातून परिपूर्ण व्यावसायिक शेती करीत आहेत आणि इतरांनाही मार्गदर्शक ठरले, अशांची ‘कृषी पदवीधर आयडॉल’म्हणून निवड केली जाते.

राजुरा (जि. चंद्रपूर) येथील विमलादेवी वाघूजी गेडाम यावेळी ‘शेतकरी आयडॉल’ ठरल्या. त्यांनी शेतीत उल्लेखनिय कामे केली आहेत. सूक्ष्म माती परीक्षण, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, सूक्ष्म सिंचन पद्धती, विविध पीक पद्धतीसह त्या इतर उपक्रमात सक्रीय आहेत.

तर डॉ. मोहन बेलगमवार हे एमएससी ॲग्री झालेले असून पुण्यात एका कंपनीचे संस्थापक आहेत. शेती उपयुक्त सेंद्रीय कृषी उत्पादीत करून विविध राज्यात विपणन करीत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘कृषी पदवीधर आयडॉल’ म्हणून निवडण्यात आले.

विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी स्वतः शेती करताना इतरांसाठी प्रेरक म्हणून कार्य केले आहे तथा कृषी विद्यापीठाच्या संपर्कातून अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब केला. त्यांनी संबंधित जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र अथवा विद्यापीठाच्या अकोला येथील शिक्षण विस्तार संचालकांसोबत संपर्क साधून आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांना करून द्यावा. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना देखील ‘आयडॉल’ म्हणून सन्मान करता येईल, असे आवाहन शिक्षण विस्तार संचालक डॉ.धनराज उंदीरवाडे यांनी केले आहे.

प्रयोगशील शेतकरी तथा शेती आणि शेतकरी समर्पित कृषी पदवीधर यांच्या कार्यपरिचयातून इतरही प्रयोगशील, प्रगतिशील शेतकरी बंधू भगिनींना तथा कृषी पदवीधरांना व्यावसायिक शेतीची प्रेरणा मिळावी तथा त्यांनी शेतीकडे वेळावे व यातूनच शाश्वत ग्रामविकास साध्य व्हावा ही विद्यापीठाची भावना आहे.
- डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. पंदेकृवि, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT