Nitiin Gadkari  Agrowon
ॲग्रो विशेष

Asian Citrus Congress : एशियन सिट्रस काँग्रेसमध्ये ‘पंदेकृवि’चा दबदबा

Nitin Gadkari : नागपूर येथे गेल्या महिन्यात झालेल्या एशियन सिट्रस काँग्रेस परिषदेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा दबदबा राहिला.

 गोपाल हागे

Akola News : नागपूर येथे गेल्या महिन्यात झालेल्या एशियन सिट्रस काँग्रेस परिषदेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा दबदबा राहिला. ‘इंडियन सोसायटी ऑफ सिट्रिकल्चर’, भारतीय कृषी संशोधन परिषद, न्यू दिल्ली व केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

‘आर्थिक समृद्धीसाठी ॲडव्हान्सिंग सीट्रिकल्चर’ अशी याची संकल्पना होती. परिषदेत जगातील १५ देशांतून आणि भारतातील २० राज्यांतून ३०० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांनी लिंबूवर्गीय संशोधनपर सादरीकरण करीत शेतकरीभिमुख संशोधनाच्या माध्यमातून विविध पारितोषिके पटकावली.

फळशास्त्र विभागात कार्यरत सहयोगी प्रा. डॉ. उज्ज्वल राऊत यांना संत्रावर्गीय उत्कृष्ट संशोधनपर सादरीकरणासाठी तसेच आचार्य पदवीची विद्यार्थिनी ऋतुजा देशमुख हिला तिच्या उत्कृष्ट सादरीकरणाला पारितोषिक मिळाले.

कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विनोद राऊत, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र (काटोल) येथील सहायक प्रा. डॉ. हितेंद्रसिंग गोरमनगर, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पा(फळे)त कार्यरत असलेले वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. योगेश इंगळे, सहा. प्रा. नवीन राठोड यांनाही सादरीकरणासाठी पारितोषिके मिळाले.

कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्पा (फळे)चे प्रभारी अधिकारी तथा उद्यान विद्यावेत्ता प्रा. डॉ. दिनेश पैठणकर यांना त्यांच्या लिंबूवर्गीय फळपिकात तसेच उद्यानविद्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय संशोधन, विस्तार व शिक्षण कार्याबद्दल ‘इंडियन सोसायटी ऑफ सिट्रिकल्चर’ या संस्थेची फेलोशिप देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Disease: उन्हाळ्यात टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांसाठी ३ सोपे उपाय

Sugarcane GPS Survey: उत्तर प्रदेशात ऊस पिकाचे जीपीएस सर्वेक्षण, शेतकऱ्यांना 'एसएमएस'द्वारे माहिती, अनेक फायदे मिळणार

Crop Insurance Delay: पीक विमा तत्काळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा

World Veterinary Day: पशुवैद्यकीय सेवांमुळेच पशुधन सुरक्षित

Farmer Protest: आंबा, काजू उत्पादकांचा १५ मे रोजी ‘वर्षा’वर मोर्चा

SCROLL FOR NEXT