Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : आंबेगाव तालुक्यात पाझर तलाव अद्याप कोरडेच

Water Shortage : आंबेगाव तालुक्यात जुलै महिना संपत आला तरी जोरदार पाऊस होत नाही. महाळुंगे पडवळ, चास-ठाकरवाडी, लौकी व अन्य पाझर तलाव कोरडे पडले आहेत.

Team Agrowon

Pune News : आंबेगाव तालुक्यात जुलै महिना संपत आला तरी जोरदार पाऊस होत नाही. महाळुंगे पडवळ, चास-ठाकरवाडी, लौकी व अन्य पाझर तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

चास-ठाकरवाडी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एकूण पाच छोटे व तीन मोठे बंधारे आहेत. बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात येऊन बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचा काही प्रमाणात प्रश्न निर्माण झाला आहे. जुलै महिना निम्मा संपला तरी ओढ्या-नाल्यांना पाणी आले नाही. पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास पाणी टंचाई जाणवेल, असे सरपंच आशा खंडू पारधी यांनी दिली.

जुलै महिना संपून गेला तरी महाळुंगे पडवळ परिसरात जोरदार पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे अद्याप ओढ्यांना पाणी आले नाही. परिणामतः महाळुंगे पडवळ ते नारायणगाव रस्त्यालगत ठाकरवाडी येथे असलेला पाझर तलाव कोरडा आहे.

पावसावर अवलंबून असणारी पिकेही सुरू लागली आहेत. पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास नजीकच्या काळात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल, अशी माहिती हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर व माजी सरपंच चंद्रकांत जाधव यांनी दिली.

टाकेवाडी येथे म्हसोबा महाराज मंदिरानजीक असलेल्या बंधाऱ्यात अल्पपाणी शिल्लक आहे. चिखलेमळा, पाटीलवाडी, ठाकरवाडी, शिंदेवस्ती व वायाळवस्ती या वाडीवस्तीवरील नागरिकांची शेती या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने ऐन पावसाळ्यात पिकांना देखील पाणी कमी पडत आहे. लौकी येथील विविध ठिकाणी असलेले सहा बंधाऱ्यात अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. लवकरच हे बंधारे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.

आंबेगाव तालुक्यातील चास, ठाकरवाडी, महाळुंगे पडवळ, साकोरे, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, नांदूर, कळंब, लौकी, चांडोली बुद्रुक आदी गावात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे ओढ्या नाल्यांवरील बंधारे व पाझर तलाव कोरडे आहेत. डोंगर भागात पेरणी केलेले सोयाबीन पिकाची उगवण झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट काही शेतकऱ्यांवर आले आहे.
- बन्सी शेगर, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT