Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : सोयाबीन उत्पादकांना सरसकट भरपाई द्या

Unseasonal Rain : कधी संततधार पाऊस, तर कधी पावसाचा खंड आणि तापमानात वाढ अशी विचित्र स्थिती खरीप हंगामात निर्माण झाली. या बदलत्या वातावरणामुळे सोयाबीनवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला.

Team Agrowon

Vardha News : वातावरणातील बदलाचा फटका बसल्याने सोयाबीनची उत्पादकता प्रभावीत झाली. ही बाब विचारात घेता हिंगणघाट तसेच सेलू तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक तसेच माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हिंगणघाट तहसीलदारांना निवेदन देत ही मागणी केली. निवेदनानुसार, सरकारच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा काढला. आपत्तीच्या काळात हा आधार ठरेल, असा विश्‍वास शेतकऱ्यांना होता.

दरम्यान, कधी संततधार पाऊस, तर कधी पावसाचा खंड आणि तापमानात वाढ अशी विचित्र स्थिती खरीप हंगामात निर्माण झाली. या बदलत्या वातावरणामुळे सोयाबीनवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला. हाताला काहीच लागणार नाही, अशी शक्‍यता निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात गुरे चारली तर काहींनी रोटाव्हेटर मारून पीक काढून टाकले.

उत्पादकता खर्चाची भरपाई देखील दुरापास्त झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना देखील विमा कंपनीला दिली. त्यासोबतच कृषी विभागाकडे देखील ऑनलाईन तक्रारी नोंदविण्यात आल्या. विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची हतबलता लक्षात घेता नुकसान अधिक दाखविण्यासाठी ५०० रुपयांची मागणी करण्यात आली.

ज्यांनी पैसे दिले त्यांचे पंचनामे व इतर प्रक्रिया झाली. परंतु ज्यांनी दिले नाही त्यांच्या शेताकडे देखील विमा प्रतिनिधी फिरकले नाही, असा आरोप या वेळी करण्यात आला. परिणामी ९० टक्‍के शेतकऱ्यांना विमा परतावा मिळू शकला नाही. या प्रकरणाची चौकशी करून सर्व सोयाबीन उत्पादकांना सरसकट विमा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी शेतकरी चोखाराम डफ, नंदकुमार पिस्दूरकर, अरुण डफ, दिवाकर तेल्हांडे, मारुती पिस्दूरकर, दिनकर कचाटे, सुरेश विरुळकर, वैशाली उरकुडे, सुनील गावस्कर, गणपत विरुळकर, मनीषा उरकुडे यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT