agrowon
ॲग्रो विशेष

Soybean : सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्या

येलो मोझॅकसह मूळकुज व इतर कीडरोगामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

वर्धा ः येलो मोझॅकसह मूळकुज व इतर कीडरोगामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे त्यांना सरसकट भरपाई देण्यात यावी, असा ठराव वर्धा बाजार समितीने घेतला आहे. आमसभेत घेण्यात आलेला हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत

शासनाला पाठविण्यात आल्याने शासनस्तरावर याप्रकरणी काय भूमिका घेतली जाते हे पाहणे औत्स्युक्‍याचे ठरणार आहे.

वर्धा बाजार समितीची २०२२-२३ या वर्षातील वार्षिक आमसभा बाजार समिती सभागृहात पार पडली. सभापती अमित गावंडे हे अध्यक्षस्थानी होते. सभेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला.

सोयाबीनची उत्पादकता सातत्याने कमी होत असताना या वर्षी तर हे पीक पूर्णपणे कीड-रोगाने पोखरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट भरपाई मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले. ही बाब सर्वांनुमते मान्य करीत सोयाबीन उत्पादकांना भरपाई मिळण्यासंदर्भातील ठराव संमत करण्यात आला. सभापती अमित गावंडे, उपसभापती पांडुरंग देशमुख, संचालक विलास मेघे, पुरुषोत्तम टोणपे, पवन गोडे, संदीप देशमुख, संदीप शिंदे, अमित देशमुख, प्रफुल्ल कुचेवार, दिनेश गायकवाड, महेश भुतडा, विशाल तिवारी, मुकुंद बेलखेडे, वैशाली उमाटे, सोनल भोगे यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच, सेवा सोसायटीचे पदाधिकारी, अडते, व्यापारी, बाजार समिती सचिव समीर पेंडके उपस्थित होते.

राज्यात पहिलाच ठराव

यंदा सोयाबीन पीक कीड-रोगांनी पोखरले आहे. एकट्या विदर्भात १७.५० लाख हेक्‍टरपैकी दोन लाख हेक्‍टर क्षेत्र बाधित असल्याचे सांगितले जाते. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी करणारी वर्धा राज्यातील एकमेव बाजार समिती ठरली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: ५० शेळ्या, ५ बोकडांसाठी ८.५ लाखांपर्यंत अनुदान! ग्रामीण शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

Mango Season: तुम्हाला तुमच्या झाडाचे आंबे खायचे आहेत का...

Traditional Food Culture: वरण-भात आणि खाद्यसंस्कृती

Women in Agriculture: स्त्रियांच्या अधिकाराला अंधश्रद्धेचा विळखा

Interview with Dr Jitendrakumar Kadam: महाराष्ट्रातील हळदीला जागतिक संधी

SCROLL FOR NEXT