राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशत Leopard terror in eight districts of the state 
ॲग्रो विशेष

Leopard Terror : वन खात्याकडून गस्ती पथके तैनात

Forest Department : कारंबा परिसरात बिबट्यासदृश प्राण्याने म्हशीच्या मानेला चावा घेतल्याची तक्रार मिळाल्यानंतर वनखात्याने सजगता बाळगत रात्रीची गस्त पथके तैनात केली आहेत.

Team Agrowon

Solapur News : कारंबा परिसरात बिबट्यासदृश प्राण्याने म्हशीच्या मानेला चावा घेतल्याची तक्रार मिळाल्यानंतर वनखात्याने सजगता बाळगत रात्रीची गस्त पथके तैनात केली आहेत. मागील काही दिवसांपासून बिबट्यासदृश प्राणी मार्डी, मंद्रूप, कारंबा परिसरात फिरत असल्याची भीती लोकांमध्ये व्यक्त होत आहे.

प्रत्यक्षात कारंबा येथील एका शेतकऱ्याने त्याच्या म्हशीच्या मानेला चावा घेतल्याचे वनखात्याकडे तोंडी तक्रारीद्वारे सांगितले. नंतर या शेतकऱ्याने वन खात्याकडे संपर्क साधला नाही. त्यामुळे अजूनतरी वन खात्याकडे कोणतीही ठोस तक्रार नाही. मात्र, या घटनेनंतर खेड्यापाड्यात बिबट्या असल्याची अफवा जोरात पसरली आहे.

त्यातच मोबाईल संदेशातून अफवांचे पीक आले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. घटना अथवा पुरावा नसला तरी वन खात्याने सजग होऊन गस्त पथक तैनात केले आहे. रात्रीच्या वेळी विशेष पथक विविध भागात फिरत आहे.

काय काळजी घ्यावी

  •  बाहेर जाताना मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजवावी

  •  हातात घुंगरकाठी वाजवत जावे

  •  रात्रीच्या वेळी एकटे फिरू नये

  •  शेतात काम करताना वाकून काम करत असताना दुसऱ्याने उभे राहावे कारण बिबट्या वाकलेल्या माणसाला शिकार समजतो

  •  लहान मुलांना शक्यतो एकटे सोडू नये

  •  शेतावर व वस्तीवर शेकोटी पेटवून ठेवावी

कुत्र्यांना धोका अधिक

माणसाच्या तुलनेत बिबट्याचा धोका कुत्र्यांना अधिक असतो. कुत्रे हे त्याचे खाद्य असू शकते. तसेच कुत्र्यांची मोठी संख्या पाहता हा धोकादायक ठरतो.

सध्या तरी बिबटयासदृश प्राण्याच्या हल्ल्याची तक्रार नाही. तरीही सजगता म्हणून रात्रीचे गस्तीपथक तैनात केले आहे. तसेच लोकांना काळजी काय घ्यावी याबाबतची माहिती देत आहोत.
- दीपक खलाने, परिक्षेत्रीय वन अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT