Pasha Patel Agrowon
ॲग्रो विशेष

Pasha Patel : पाशा पटेल यांना कॅबिटनेट मंत्रिपदाचा दर्जा

Ministerial Status : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला. याबाबतचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले आहे.

Swapnil Shinde

Cabinet Expansion News : शेतकरी नेते पाशा पटेल यांची मागील महिन्यात राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना आता कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला असून याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला आहे.

राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा या दुहेरी उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१७ मध्ये राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापन केली होती. त्याच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर मागील महिन्यामध्ये पाशा पटेल यांची फेरनिवड करण्यात आली. यापूर्वी त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला होता. परंतु आता त्यांना देण्यात आलेली जबाबदारी आणि कामकाजाचे स्वरूप तसेच अध्यक्षांना केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगामध्ये करावे लागणारे राज्याचे प्रतिनिधीत्व या सर्व बाबींचा विचार करून शासनाने राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्री पदास समकक्ष दर्जा दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT