Old Pension Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठीच्या संपात कर्मचाऱ्यांचा सहभाग

नव्या योजनेद्वारे दिले जाणारे निवृत्तिवेतन अत्यंत तुकडे आहे. त्यात वृद्धापकाळातील चरितार्थ भागविणे अवघड आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जुन्या पेन्शन योजनेसाठी मंगळवारपासून (ता. १४) पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात प्रशासनाच्या कृषी, महसूलसह विविध विभागातील तसेच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे अनेक विभागातील कामे खोळंबली तर कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.

नव्या योजनेद्वारे दिले जाणारे निवृत्तिवेतन अत्यंत तुकडे आहे. त्यात वृद्धापकाळातील चरितार्थ भागविणे अवघड आहे.

त्यामुळे शेवटच्या वेतनाच्या निम्म्या रकमेची तरतूद असलेली १९८२ सालची जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने १२ मार्चला कृषी आयुक्तांना निवेदन पाठवून संघटना संपात सहभागी होत असल्याचे कळविले होते, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस शिवानंद आडे यांनी दिली.

त्यानुसार कृषी विभागातील वर्ग तीन व चारचे कर्मचारी मंगळवारी संपात सहभागी झाले. महसूल आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आदी ठिकाणी जमलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT