Parliament Session Agrowon
ॲग्रो विशेष

Parliament Session : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर, 'नारी शक्ती वंदन कायदा'

Women Reservation Bill : नवीन संसद इमारतीमध्ये आज महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडले. त्यामुळे आता महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे.

Swapnil Shinde

Parliament Special Session Live : नवीन संसद भवनात सरकारने लोकसभेच्या कामकाजात पहिले विधेयक सादर केले. पहिलेच विधेयक महिला आरक्षणाशी संबंधित आहे. त्याला 'नारी शक्ती वंदन कायदा' असे नाव देण्यात आले आहे.

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडले. या विधेयकात लोकसभा आणि विधानसभेच्या ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. याचा अर्थ आता लोकसभा आणि विधानसभेची प्रत्येक तिसरी सदस्य एक महिला असेल.

गणेश चतुर्थीच्या पवित्र सणानिमित्त पंतप्रधान मोदींच्या भाषणाने संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कायदा व न्याय मंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल यांनी विरोधकांच्या गदारोळात 'संविधान (एकशेवीसवी सुधारणा) विधेयक, 2023' सादर केले. नवीन संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे.

या विधेयकाची ओळख करून देताना केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, हे महिला सक्षमीकरणाशी संबंधित विधेयक असून ते कायदा झाल्यानंतर ५४३ सदस्यीय लोकसभेत महिला सदस्यांची संख्या सध्याच्या ८२ वरून १८१ वर जाईल. ते पारित झाल्यानंतर विधानसभेतही महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव होतील, असे ते म्हणाले. सध्या विधेयकात १५ वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली असून ती वाढवण्याचा अधिकार संसदेला असेल, असे ते म्हणाले. महिलांसाठी राखीव जागांवरही अनुसूचित जाती/जमातीसाठी आरक्षण असेल, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.

लोकसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांचे सरकार "नारीशक्ती वंदन विधेयक" ला लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिला आरक्षण देणारा कायदा बनवण्याचा कटिबद्ध आहे. मोदी म्हणाले, 'नारी शक्ती वंदन कायद्यामुळे आपली लोकशाही अधिक मजबूत होईल. नारी शक्ती वंदन कायद्यासाठी मी देशातील माता, भगिनी आणि मुलींचे अभिनंदन करतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT