Unseasonal Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : परभणी, हिंगोलीत अवकाळीचा फटका

Crop Damage : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत शनिवारी (ता. ३०) रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस झाला.

माणिक रासवे

Parbhani News : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत शनिवारी (ता. ३०) रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस झाला. सुगी सुरू असलेली रब्बी ज्वारी, गहू, हळद तसेच वेचणी राहिलेला फरदड कापूस शेतामध्ये भिजल्यामुळे तसेच केळीचे पाने फाटल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

शनिवारी (ता. ३०) रात्री साडेआठच्या सुमारास परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील तसेच हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील अनेक गावांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस झाला.

काही भागात १५ ते ३० मिनिट जोरदार पाऊस झाला. सध्या या दोन जिल्ह्यांत रब्बी ज्वारी, गहू, हरभरा यासह हळदीची काढणी सुरू आहे. उशिरा पेरणी केलेली ज्वारी, गहू, करडई आदी पिके उभी आहेत.

अनेक भागात कापणी केलेल्या ज्वारीच्या पेंढ्याची पसर शेतात आहे. पावसामुळे ज्वारीच्या कणसात माती जाऊन नुकसान झाले. गव्हाच्या ओंब्या भिजल्यामुळे दाण्याची प्रत खराब झाली. मजूर न मिळालेल्या वेचणी राहिलेला कापूस भिजला आहे.

दुष्काळी स्थितीत अवकाळी पावसाने हाती आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आमच्या भागात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने नांगरटीत पाणी थळथळले. सुगी सुरू असलेल्या ज्वारी, गव्हाचे अतोनात नुकसान झाले असे केकरजवळा (ता. मानवत) येथील शेतकरी माणिक गजमल यांनी सांगितले.

अवकाळी पावसात शिजवून शेतामध्ये वाळवत टाकलेली हळद भिजली. अचानक पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमळा झाकता आला नाही. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या पानाच्या झिरमाळ्या झाल्या आहेत, असे डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील शेतकरी पंकज अडकिणे व गणेशराव सारंग यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT