Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : नैसर्गिक आपत्तीअंतर्गत दोन कोटी रुपये पीकविमा मंजूर

Crop Damage Compensation : परभणी जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये विविध जोखीमबाबीअंतर्गत ७ लाख ५७ हजार ८२१ शेतकऱ्यांना ४३० कोटी ८७ लाख रुपये पीकविमा मंजूर आहे.

Team Agrowon

Parbhani News : खरीप २०२४ मधील मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकाच्या नुकसानीबद्दल पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत व्यापक प्रसारित स्थानिक नैसर्गिक आपत्ती (वाइड स्प्रेड लोकल कॅलेमिटी-डब्ल्यू.एस.एल.) या जोखीमबाबी अंतर्गत परभणी जिल्ह्यातील २५ हजार ३७७ शेतकऱ्यांना २ कोटी ६९ लाख रुपये एवढा पीकविमा मंजूर आहे.

आजवर २३ हजार ६५१ शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची २ कोटी ४८ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. दरम्यान, खरीप २०२४ मध्ये विविध जोखीम बाबीअंतर्गत ७ लाख ४४ हजार ५२१ शेतकऱ्यांना ४०५ कोटी ९९ लाख रुपये विमा वाटप झाले, आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

व्यापक (सर्वदूर) प्रसारित स्थानिक आपत्ती अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ७ हजार ६३४ हेक्टरवरील पिके बाधित आहेत. त्यात ५१ मंडलांतील ५ हजार ३९७ हेक्टर मूग, ४५ मंडलांतील २ हजार ७२७ हेक्टर उडीद, ४३ मंडलांतील ६९३.९६ हेक्टर ज्वारी, ३४ मंडलांतील ६३.५७ हेक्टर बाजरी या पिकांचा समावेश आहे. या पिकांसाठी विमासंरक्षण घेतलेल्या व नुकसानीची तक्रार दाखल केलेल्या विमा मंजूर करण्यात आला.

४३० कोटी ८७ लाख रुपये पीकविमा

परभणी जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये विविध जोखीमबाबीअंतर्गत ७ लाख ५७ हजार ८२१ शेतकऱ्यांना ४३० कोटी ८७ लाख रुपये पीकविमा मंजूर आहे.

त्यात मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड-सीझन अॅडव्हर्सिटी) अंतर्गत सोयाबीन, कपाशी, तूर पिकांसाठी २९९ कोटी २३ लाख रुपये २५ टक्के मर्यादेत अग्रिम विमा, स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलेमिटीज -एल.सी.) अंतर्गत १०४ कोटी ७७ लाख रुपये, काढणीपश्‍चात नुकसान (पोस्ट हार्वेस्टिग ः पी. एच.)अंतर्गत २४ कोटी १८ लाख रुपये, व्यापक प्रसारित स्थानिक आपत्ती (वाइड स्प्रेड लोकल कॅलेमिटीज) अंतर्गत २ कोटी ६९ लाख रुपये विमा भरपाईचा समावेश आहे. एकूण मंजूर ४३० कोटी ८७ लाख रुपये पैकी ४०५ कोटी ९९ लाख रुपये विम्याचे वाटप झाले आहे. राज्य शासनाच्या हिश्‍शाचा दुसरा विमा हप्ता थकित असल्यामुळे काढणी पश्‍चात नुकसान अंतर्गत २४ कोटी १८ लाख रुपये पीकविमा प्रलंबित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT