Pankaja munde  Agrowon
ॲग्रो विशेष

Pankaja munde : शरद पवार यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांचा थेट इशारा; म्हणाल्या, '...तर रस्त्यावर उतरावं लागेल'

Pankaja Munde warning to government : ऊसतोड कामगारांच्या मजूरीवर तोडगा निघाला आहे. तर कामगारांच्या मजुरीत ९२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा तोडगा शरद पवार पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर निघाला. मात्र यानंतर मुंडे यांनी थेट सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजूरीवरून पेच उद्भवला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरूवारी (ता.४ रोजी) सायंकाळी पुण्यात भेट घेतली होती. त्यावेळी मजूरीच्या प्रश्नावर तोडगा निघाला. ज्यात ऊसतोड कामगारांच्या मजुरीत ९२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळावरून पंकजा मुंडे यांनी थेट सरकारला इशारा देत नाराजी व्यक्त केली आहे.

ऊसतोड कामगारांच्या मजूरीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी ऊसतोड कामगारांच्या मागणीवर चर्चा झाली. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा संदर्भात देखील चर्चा झाली.

त्यानंतर पंकजा मुंडे यांनी शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरून आपण रस्त्यावर उतरू, आंदोलन करू असा थेट इशाराच सरकारला दिला आहे.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी शरद पवार हे या प्रश्नावरून सरकारवर नाराज असल्याचे ते म्हणाले. तर याच प्रश्नावर मी देखील सरकारवर नाराज आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर मी सरकारला अंतिम इशारा देत असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

तसेच गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे काम सध्या व्यवस्थित सुरू आहे. वाटचालही चांगली सुरू आहे. पण ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर सरकार योग्य भूमिका घेत नाही. त्यामुळे आंदोलन करावे लागते की काय अशी स्थिती सध्या आहे. पण ती निर्माण होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी. मात्र स्थिती निर्माण झालीच तर मला रस्त्यावर उतारवे लागेल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तर गरज पडल्यास आंदोलन करू असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT