Pankaja Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Pankaja Munde : वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे बिनविरोध

Vaidyanath Cooperative Sugar Factory : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची सोमवारी (ता. १९) सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

Team Agrowon

Beed Election Result News : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची सोमवारी (ता. १९) सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सर्वच्या सर्व संचालक बिनविरोध निवडून आले होते.

सोमवारी (ता. १९) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक जाधव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यामध्ये पंकजा मुंडे यांची पुन्हा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची निवड झाली.

या बैठकीस संचालक सतीश मुंडे, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, अजय मुंडे, वाल्मीक कराड, रेशीम कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे, राजेश गित्ते, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे, सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे, केशव माळी आदी उपस्थित होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालकांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

संचालकांनी घेतले गोपीनाथ गडाचे दर्शन...

पंकजा मुंडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी त्यांचा सत्कार केला. बैठकीनंतर पंकजा मुंडे, चंद्रकांत कराड यांच्यासह सर्व संचालकांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price Demand: साताऱ्यात ऊसदराचा तिढा चिघळला; पहिली उचल जाहीर करण्याची मागणी

Indian Agriculture Export: भारतीय शेतीमाल निर्यातीला वाढती संधी

Warana Sugar Factory: ‘वारणा’चा गळीत हंगाम सुरू; यंदा १३ लाख टन गाळपाचे लक्ष्य

Agniveer Recruitment: २८२ नौदल अग्निवीरांना पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Sangli District Bank: सांगली जिल्हा बँकेच्या १५ जागा बिनविरोध; सहा जागासाठी निवडणूक

SCROLL FOR NEXT