Shiwarferi Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Shiwarferi : ‘पंदेकृवित’ उद्यानविद्या विभागातर्फे शिवारफेरी

Horticulture Department Shiwarferi : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत उद्यानविद्या विभागातर्फे हॉर्टिकल्चर दिवसाचे औचित्य साधत बुधवार (ता. २१) आणि गुरुवारी (ता. २२) फळ, फूल, भाजीपालावर्गीय पिकांची खास शिवारफेरी आयोजित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत उद्यानविद्या विभागातर्फे हॉर्टिकल्चर दिवसाचे औचित्य साधत बुधवार (ता. २१) आणि गुरुवारी (ता. २२) फळ, फूल, भाजीपालावर्गीय पिकांची खास शिवारफेरी आयोजित करण्यात आली आहे.

यासाठी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर खासकरून विविध फळ, फूल, भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केलेली असून हे प्रक्षेत्र सध्या बहरलेले आहे.

पंदेकृविमध्ये १९६९ पासून उद्यानविद्या विभाग कार्यरत असून, पदव्युत्तर शिक्षण व संशोधनाचे काम सुरू आहे. त्यानंतर १९९५-९६ पासून या विभागात पीएचडी पदवी अभ्यासक्रम सुरू झाला. नंतर स्वतंत्र उद्यानविद्या महाविद्यालयही सुरू करण्यात आले.

पुढील टप्प्यात एमएसस्सी पदव्युत्तर (उद्यानविद्या) आणि उद्यानविद्या पदवी सुरू झाली. उद्यानविद्या शाखेअंतर्गत फळबाग शास्त्र, भाजीपालाशास्त्र, फुलशेती शास्त्र या तीन वेगवेगळ्या विषयातील पदव्युत्तर पदवी व पीएचडी पदवी प्रदान करण्यात येतात.

या वर्षी उद्यानविद्या महाविद्यालय रजत वर्षामध्ये प्रवेश करीत आहे. या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्यानविद्या दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त फळे, भाजीपाला व फुलांच्या विविध वाणांचे प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आलेली आहेत.

फळपिकांमध्ये संत्रा पिकाची सघन लागवड, आंब्याची अति सघन लागवड, चिकू बाग, ड्रॅगन फ्रूट, चिंचेच्या विविध जाती तसेच सर्व फळपिकांची अद्ययावत नर्सरी शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहे.

२१ भाजीपाला पिकांमध्ये ३४ विविध वाणांचे प्रात्यक्षिके आहेत. वेलवर्गीय भाजीपाला, कोबीवर्गीय भाजीपाला, पालेभाज्या, टोमॅटो, मिरची, वांगी, हळद, कांदा व कांदा बीजोत्पादन व लसूण लागवड ही पिके शेतकऱ्यांना पाहावयास आहेत.

या पिकांमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञानसुद्धा प्रदर्शित केले आहे. ठिबक सिंचन, प्लॅस्टिक आच्छादन, उंच वाफे लागवड व विविध वाण, फुलपिकांमध्ये गुलाब, झेंडू, निशिगंध, ग्लॉडिओलाय, शेवंती, डेझी, गिलार्डिया यांसह विविध शोभिवंत झाडांची प्रात्यक्षिके आहेत. अद्ययावत हरितगृहामध्ये विविध फळ पिकांचे रोपे/कलमे तयार करण्याच्या पद्धती,

फळरोपवाटिका, हायड्रोफोनिक भाजीपाला उत्पादन, हरितगृहातील भाजीपाला उत्पादन या सर्व बाबी आहेत. उद्यानविद्या दिवसानिमित्त आयोजित प्रात्यक्षिकांचा शेतकऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उद्यानविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई यांनी केले आहे. उद्यानविद्या शाखेतील आजी-माजी विद्यार्थ्यांचा गुरुवारी (ता. २२) स्नेहमिलन कार्यक्रमसुद्धा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT