Kardai Agrowon
ॲग्रो विशेष

Kardai Production : करडई, जवस उत्पादन वाढीसाठी पंचसूत्री अवलंबवावी

Safflower : करडई पिकात पेरणीस उशीर झाल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे वेळेवर पेरणी करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Parbhani News : करडई व जवस पिकांमध्ये बीजप्रक्रिया, वेळेवर पेरणी, संतुलीत अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या पंचसूत्रीचा अंगीकारातून उत्पादकता वाढ शक्य आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठाचे अंबाजोगाई येथील विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ.वसंत सूर्यवंशी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र व शेकरु फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित सेंद्रिय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेचा १५ वा भाग करडई व जवस लागवडीची पंचसूत्री या विषयावर मंगळवारी (ता. १५) ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांच्या अध्यक्षेत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख आयोजक संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, डॉ.आनंद गोरे, डॉ. पपिता गौरखेडे, आम्रपाली गुंजकर उपस्थित होते.

डॉ. सुर्यवंशी म्हणाले, की करडई पिकात पेरणीस उशीर झाल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे वेळेवर पेरणी करणे आवश्यक आहे. करडई मध्ये परभणी- १२, पीबिएनएस- १५४, पीबिएनएस- ८६, पीबिएनएस- ४० तर जवस पिकाचे एलएसएल-९३,एलएन- १४२ हे वाण लागवडीसाठी वापरावेत.

डॉ.इंद्र मणी म्हणाले, की रब्बी पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन व कार्यक्षम पाणी व्यवस्थापन यावर भर द्यावा. याबाबतचे तंत्रज्ञान शेतक­ऱ्यांना उपलब्ध करून द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT